‘रूस्तुम’ ची शूटिंग संपली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 14:14 IST2016-04-15T08:41:54+5:302016-04-15T14:14:35+5:30

‘एअरलिफ्ट’ मुळे अक्षय कुमारच्या वर्षाची सुरूवात फारच उत्तम झाली. आता त्याचा आगामी प्रोजेक्ट ‘रूस्तुम’ ची शूटिंग नुकतीच संपली. यात ...

Shooting of 'Rustam' is over! | ‘रूस्तुम’ ची शूटिंग संपली!

‘रूस्तुम’ ची शूटिंग संपली!

अरलिफ्ट’ मुळे अक्षय कुमारच्या वर्षाची सुरूवात फारच उत्तम झाली. आता त्याचा आगामी प्रोजेक्ट ‘रूस्तुम’ ची शूटिंग नुकतीच संपली. यात अक्की नवल आॅफिसरच्या भूमिकेत आहे, जो त्याची प्रामाणिकता जपण्यासाठी स्वत:च्या अस्तित्वाची लढाई करतो.

आज नुकतेच रूस्तुमच्या सेटवरून अक्षयने एक फोटो शेअर केला आहे ज्यात तो फोटो ‘रूस्तुम’ ची शूटिंग संपल्याचे दर्शवतो आहे. त्या फोटोला अक्षयने कॅप्शन दिले आहे की,‘ इट्स टाईम टू रेस्ट द कॅप कॉझ ईट्स अ रॅप. लास्ट डे आॅफ रूस्तुम टूडे, हॅड अ बॉल शूटींग धीस वन.’

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी रूस्तुम रिलीज होणार असल्याने अक्षय कुमार खुपच आनंदीत आहे. नीरज पांडे दिग्दर्शित ‘रूस्तुम’ चित्रपट १२ आॅगस्ट रोजी रिलीज होणार आहे. त्याचे ‘स्पेशल २६’ आणि ‘बेबी’ चित्रपटांप्रमाणेच हा चित्रपटही रसिकांची गर्दी खेचणार यात काही शंकाच नाही.

rustom

Web Title: Shooting of 'Rustam' is over!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.