शूटिंगचे दिवस होते 'शानदार'- शाहिद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:43 IST2016-01-16T01:17:52+5:302016-02-07T08:43:03+5:30
बॉ लीवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या 'शानदार' या चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांची तो सध्या तोंडभरून स्तुती करताना ...

शूटिंगचे दिवस होते 'शानदार'- शाहिद
ब लीवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या 'शानदार' या चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांची तो सध्या तोंडभरून स्तुती करताना दिसतोय. त्यांच्याबद्दल बोलताना तो म्हणाला, 'विकास खूप सकारात्मक विचाराचा आहेत. त्यामुळे सेटवर नेहमी मस्त, शांत आणि मजेशीर वातावरण असते.' आपल्या चाहत्यांशी शूटिंगचे अनुभव शेअर करताना शाहिद म्हणाला की, 'मी आणि आलिया शूटिंग करत असताना सेटवरचा 'माहोल'ही एकदम शानदार असायचा. त्यामुळे आम्ही त्या वातावरणात एकदम मिसळून गेलो. चित्रपटाची पूर्ण टीम एकदम तरूण आणि उत्साहपुर्ण होती. आमच्या सगळ्यांमध्ये एक साम्य होते, की आम्हाला सगळ्यांनाच पार्टी करायला फार आवडते. मी आजपर्यंत कधीच अशा ग्रेट टीम सोबत काम केलेले नव्हते.'