​ ‘जूते मारो’च्या इशा-यांने रामगोपाल वर्मांना धडकी; मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 11:08 IST2017-03-10T05:38:37+5:302017-03-10T11:08:37+5:30

जागतिक महिला दिनी महिलांबद्दल आक्षेपार्ह tweets करणे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी गोव्यात दोन ...

'Shohu Maro' scared Ramgopal Verma; Ask forgiveness | ​ ‘जूते मारो’च्या इशा-यांने रामगोपाल वर्मांना धडकी; मागितली माफी

​ ‘जूते मारो’च्या इशा-यांने रामगोपाल वर्मांना धडकी; मागितली माफी

गतिक महिला दिनी महिलांबद्दल आक्षेपार्ह tweets करणे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी गोव्यात दोन गुन्हे दाखल झाले असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम गोपाल यांच्यावर सडकून टीका केली आहे. स्त्रीयांचा अपमान करणा-या रामगोपाल वर्मा यांची जागा तुरुंगातच आहे, त्यांना तुरुंगात पाठवायला हवे,अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’मधून केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात राम गोपाल वर्मांना तीव्र शब्दांत झोडपून काढण्यात आले आहे. रामगोपाल वर्माने त्याच्या गटारी तोंडातून मायभगिनींचा अपमान व अपराध केला आहे. समस्त महिलांनी पुरुषांना सनी लिओनसारखा आनंद द्यावा, अशा प्रकारचे एक फालतू व घाणेरडे वक्तव्य करून या वर्मानेआमच्या संस्कृतीवरच पिचकाºया मारल्या आहेत. जागतिक महिला दिन वगैरे राहू द्या बाजूला, पण देशातील सर्वच मायभगिनींचा हा अपमान आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

ALSO READ : महिला दिनी हे काय बरळले राम गोपाल वर्मा?

दुसरीकडे फिल्म स्टुडिओ सेटिंग आणि कामगार युनियनने राम गोपाल वर्मा यांच्यावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. केवळ इतकेच नाही तर एनसीपी सदस्या विद्या चव्हाण यांनी राम गोपाल वर्मा यांनी याप्रकरणी माफी मागावी अन्यथा त्यांना चपलांनी झोडपून काढू, असा इशारा दिला आहे.
अर्थात हे सगळे प्रकरण भलतेच अंगलट आलेले पाहून राम गोपाल वर्मा यांनी माफी मागितली आहे.

{{{{twitter_post_id####}}}}


मी केवळ माझ्या भावना व्यक्त केल्या. पण माझ्या भावनांमुळे दुखावलेल्यांची मी माफी मागतो, असे tweet त्यांनी केले आहे. प्रत्येक महिलेने सनी लिओनीप्रमाणे पुरुषांना आनंद द्यायला हवा, असे वादग्रस्त tweet रामूने केले होते. त्यांच्या नेमक्या याच tweet वरून सध्या रान माजले आहे. 

Web Title: 'Shohu Maro' scared Ramgopal Verma; Ask forgiveness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.