Shocking : रिलीज अगोदरच ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ चित्रपट झाला लीक !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2017 22:28 IST2017-07-22T16:58:42+5:302017-07-22T22:28:42+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याचा मोस्ट अवेटेड ‘टॉयलेट-एक प्रेमकथा’ हा चित्रपट रिलीज होण्याअगोदरच लीक झाला आहे. निर्मात्यांसाठी हा एक मोठा ...

Shocking: 'Toilets a love story' leaked before the release !! | Shocking : रिलीज अगोदरच ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ चित्रपट झाला लीक !!

Shocking : रिलीज अगोदरच ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ चित्रपट झाला लीक !!

लिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याचा मोस्ट अवेटेड ‘टॉयलेट-एक प्रेमकथा’ हा चित्रपट रिलीज होण्याअगोदरच लीक झाला आहे. निर्मात्यांसाठी हा एक मोठा धक्का असून, अक्षयदेखील यामुळे नाराज झाला आहे. अक्षयने स्वत: याबाबतची माहिती देताना नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्याच्या चाहत्यांना याबाबतचे अपीलही केली आहे. 

अक्षयकुमारने ट्विट करताना लिहिले की, ‘पायरेसीविरोधात लढा देणे खूप गरजेचे आहे. आम्ही ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा चित्रपट लीक करणाºयाविरोधात गुन्हे शाखेकडून कारवाईची अपेक्षा करतो. मी माझ्या मित्रांना आणि चाहत्यांना अपील करतो की, त्यांनी पायरेसीला स्पष्टपणे नकार द्यावा. दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसने दावा केला होता की, रेमो डिसूजा याच्याकडे एक व्यक्ती पोहोचला होता, त्याने हा चित्रपट बघितला असा दावा केला होता. रेमो हे एकूण आश्चर्यचकीत झाला. त्याने त्या व्यक्तीला विचारले की, असे कसे होऊ शकते? त्यावर त्या व्यक्तीने हा चित्रपट त्याच्या पेन ड्राइव्हमध्ये असल्याचे म्हटले. रेमोने लगेचच तो पेन ड्राइव्ह कनेक्ट केला, तेव्हा त्याचा यावर विश्वास बसला. 

याबाबत रेमोने म्हटले की, ‘मी याविषयीची माहिती अक्षयकुमारला देण्याचा प्रयत्न केला. मात्र लंडनमध्ये असल्यामुळे त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर ही बाब चित्रपटाच्या निर्माता प्रेरणा अरोरा यांना सांगितली.’ मीडिया रिपोटर््सनुसार, जेव्हा रेमोकडून याबाबतची माहिती मिळाली तेव्हा निर्मात्यांनी लगेचच त्या व्यक्तिविरोधात गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. यावेळी प्रेरणा अरोरा यांनी गुन्हे शाखेने सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. 

या चित्रपटात अक्षयकुमार आणि भूमी पेडनेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शिवाय दिवेंदू शर्मा, सुधीर पांडे, शोभा खोटे आणि अनुपम खेर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ११ आॅगस्ट रोजी रिलीज होणार आहे. 

Web Title: Shocking: 'Toilets a love story' leaked before the release !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.