Shocking! ​अमिताभ बच्चन यांचे केवळ २५ टक्के लिव्हरच कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 18:44 IST2017-09-28T10:58:32+5:302017-09-28T18:44:20+5:30

अमिताभ बच्चन हे आज मोठ्या पडद्यावरचे नव्हे तर छोट्या पडद्यावरचे देखील मोठे नाव आहे. अमिताभ बच्चन यांचे फॅन फॉलॉव्हिंग ...

Shocking! Only 25 percent of Amitabh Bachchan is working | Shocking! ​अमिताभ बच्चन यांचे केवळ २५ टक्के लिव्हरच कार्यरत

Shocking! ​अमिताभ बच्चन यांचे केवळ २५ टक्के लिव्हरच कार्यरत

िताभ बच्चन हे आज मोठ्या पडद्यावरचे नव्हे तर छोट्या पडद्यावरचे देखील मोठे नाव आहे. अमिताभ बच्चन यांचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. त्यांना सदी का महानायक असे म्हटले जाते. त्यांच्या फॅन्ससाठी ते जीव की प्राण आहेत असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अमिताभ बच्चन यांनी वयाची सत्तरी पार केली असली तरी ते आजही दिवसातील अनेक तास काम करतात. अनेक चित्रपट आणि कार्यक्रमात ते झळकत आहेत. कधीही त्यांना कोणत्याही गोष्टीचा थकवा आला आहे किंवा चित्रीकरण करताना त्यांनी कंटाळा केला असे आपल्याला कधीच ऐकायला मिळत नाही. ते तितक्याच उत्साहात आजदेखील काम करतात. तुम्हाला माहीत आहे का की, अमिताभ हे शरीराने तंदुरुस्त दिसत असले तरी त्यांचे लिव्हर केवळ २५ टक्केच कार्य करते. तुम्हाला ही गोष्ट ऐकून नक्कीच धक्का बसला असेल.
अमिताभ बच्चन यांनीच ही गोष्ट नुकतीच त्यांच्या फॅन्सना सांगितली आहे. अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. याच कार्यक्रमाच्या एका भागात त्यांनी ही गोष्ट त्यांच्या फॅन्सना सांगितली आहे. अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, त्यांचे लिव्हर ७५ टक्के डॅमेज झाले असून त्यांचे लिव्हर २५ टक्केच कार्यरत आहे. 
कुली या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान अमिताभ बच्चन यांचा एक मोठा अपघात झाला होता. या अपघाताच्या वेळी त्यांना प्रचंड दुखापत झाल्याने त्यांचे प्रचंड रक्त वाहून गेले होते आणि त्यामुळे अनेक रक्ताच्या बाटल्या चढवण्यात आल्या होत्या. त्या रक्तातील काही बॉटलमध्ये हॅपिटायटिस बी होते. पण त्यावेळी हॅपिटायटिस बी रक्तात आहे की नाही हे शोधणे तितकेसे सोपे नव्हते. २००५ ला अमिताभ बच्चन रुटिन चेकअप साठी त्यांच्या डॉक्टरकडे गेले असताना त्यांना ही गोष्ट कळली होती. त्यांना डॉक्टरने सांगितले होते की, हॅपिटायटिस बी चे रक्त तुम्हाला चढवले गेले असल्यामुळे तुमचे लिव्हर ७५ टक्के डॅमेज झाले आहे. 

Also Read : ​‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’च्या सेटवरून लिक झाला महानायक अमिताभ बच्चनचा लूक!

Web Title: Shocking! Only 25 percent of Amitabh Bachchan is working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.