Shocking ! चक्क ‘ढिशूम’च्या आॅनलाईन लीकची जाहिरात!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 21:31 IST2016-07-24T12:38:55+5:302016-07-24T21:31:40+5:30

‘उडता पंजाब’,‘गे्रट ग्रँड मस्ती’  हे दोन चित्रपट रिलीजपूर्वीच आॅनलाईन लीक झालेत. आता ‘ढिशूम’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट  ‘आॅनलाईन लीक’ होण्याचा धोका ...

Shocking! An online leak advertisement for 'Dashoom' !! | Shocking ! चक्क ‘ढिशूम’च्या आॅनलाईन लीकची जाहिरात!!

Shocking ! चक्क ‘ढिशूम’च्या आॅनलाईन लीकची जाहिरात!!

डता पंजाब’,‘गे्रट ग्रँड मस्ती’  हे दोन चित्रपट रिलीजपूर्वीच आॅनलाईन लीक झालेत. आता ‘ढिशूम’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट  ‘आॅनलाईन लीक’ होण्याचा धोका वाढला आहे. होय, ‘टोरेंंट’ या पायरेट साईटवर ‘ Dishoom' will soon be shown’ अशी जाहिरात सुरु केली आहे. या जाहिरातीमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली जात आहे. आधी लपूनछपून पायरेसी व्हायची. पण आता चक्क पायरेसीची जाहिरात केली जात असल्याचे पाहून बॉलिवूड हादरले आहे. या जाहिरातीनंतर ‘ढिशूम’ लीक होण्याचा धोका बघता, फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स गिल्डने  आज तातडीची बैठक बोलवली. दिग्दर्शक महेश भट्ट या गिल्डचे अध्यक्ष आहेत. टॉरेंट या पायरेसी बेवसाईटवर ‘ढिशूम’ची जाहिरात सुरु असणे हे धक्कादायक आहे. चित्रपट लीक होणार अशी जाहिरात सुरु असणे यापेक्षा अधिक धक्कादायक निर्मात्यांसाठी काहीही असू शकत नाही.त्याचमुळे  प्रोड्यूसर गिल्डने तातडीची बैठक बालेवली, असे महेश भट्ट यांनी सांगितले.

Web Title: Shocking! An online leak advertisement for 'Dashoom' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.