Shocking !! पतीसोबत लाईव्ह चॅट करता करता मॉडेल रिसीला बिंतेची आत्महत्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 14:46 IST2017-08-02T09:10:09+5:302017-08-02T14:46:24+5:30
मॉडेल विदिशा आणि टीव्ही अभिनेता मनोज गोयल याच्या पत्नीच्या आत्महत्येच्या धक्कादायक बातमीनंतर पुन्हा एका आत्महत्येने मनोरंजन सृष्टी हादरली आहे. ...
.jpg)
Shocking !! पतीसोबत लाईव्ह चॅट करता करता मॉडेल रिसीला बिंतेची आत्महत्या!
म डेल विदिशा आणि टीव्ही अभिनेता मनोज गोयल याच्या पत्नीच्या आत्महत्येच्या धक्कादायक बातमीनंतर पुन्हा एका आत्महत्येने मनोरंजन सृष्टी हादरली आहे. होय, बांगलादेशी मॉडेल रिसीला बिंंते हिने गत सोमवारी गळफास लावून आत्महत्या केली. ढाक्यात राहणारी रिसीला केवळ २२ वर्षांची होती. विशेष म्हणजे, पतीसोबत लाईव्ह चॅटींग करत असताना तिने आत्महत्या केली. या आत्महत्येमागे कौटुंबिक कलह कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. तूर्तास रिसीलाच्या आत्महत्येमागचे नेमके कारण पुढे आलेले नाही. पतीसोबत व्हिडिओ चॅट करता करता अचानक असे काय घडले की, तिने आत्महत्या केली, तूर्तास तरी हा प्रश्न अनुत्तरीत आहे. पोलिस अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, रिसीला व तिच्या पतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते.
![]()
रिसीलाने दुपारी २ वाजता राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. बेशुद्धावस्थेत तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराअंती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
![]()
आत्महत्येपूर्वी रिसीला तिचा पती इमरूल हसनसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होती. रिसीला व इमरूल या दोघांना तीन वर्षांची मुलगी आहे. घटनेवेळी ती आपल्या आजी-आजोबांजवळ होती.
२०१२ मध्ये एक फॅशन शोच्या माध्यमातून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली होती. सौंदर्यासाठी रिसीला ओळखली जात होती. सोशल मीडियावर ती प्रचंड अॅक्टिव्ह होती.