Shocking! जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूरसोबत झाली मोठी फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 02:13 PM2022-05-28T14:13:34+5:302022-05-28T14:14:23+5:30

Boney Kapoor: बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर यांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. बोनी कपूर यांना पावणे चार लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.

Shocking! Janhvi Kapoor's father Bonnie Kapoor had a big scam | Shocking! जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूरसोबत झाली मोठी फसवणूक

Shocking! जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूरसोबत झाली मोठी फसवणूक

googlenewsNext

प्रसिद्ध निर्माते आणि जान्हवी कपूर(Janhvi Kapoor)चे वडील बोनी कपूर (Boney Kapoor) यांच्यासोबत सायबर फसवणूक झाली आहे. बोनी कपूर यांच्या बँक खात्यातून सुमारे चार लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.  याप्रकरणी बोनी कपूर यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. बुधवारी मुंबईतील आंबोली पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोनी कपूर यांच्या म्हणण्यानुसार, कोणीतरी त्यांच्या क्रेडिट कार्डने पाच व्यवहार केले आणि त्यांच्या खात्यातून ३.८२ लाख रुपये काढले. बोनी यांनी सांगितले की त्यांच्याकडून क्रेडिट कार्डची कोणतीही माहिती विचारली गेली नाही. तसेच, त्यांना कोणताही फोन आला नाही. बोनी कपूर म्हणाले की, त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे त्यांना समजले. त्यानंतर बँकेत बोलले. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बोनी कपूर यांचे कार्ड वापरताना कोणीतरी त्याचा डेटा काढला असल्याचा त्यांना संशय आहे. बोनी कपूर यांच्या खात्यातील पैसे गुरुग्राममधील एका कंपनीच्या खात्यात गेल्याची माहिती तपासात पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.


बोनी कपूर हे बॉलिवूडचे लोकप्रिय चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी मिस्टर इंडिया, नो एंट्री, जुदाई, वाँटेड आणि मॉम सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. बोनी कपूर लवकरच लव रंजन दिग्दर्शित चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

Web Title: Shocking! Janhvi Kapoor's father Bonnie Kapoor had a big scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.