Shocking : ड्रग्ज प्रकरणात आयटम गर्ल मुमैत खानची एसआयटी करणार चौकशी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 15:46 IST2017-07-25T10:16:24+5:302017-07-25T15:46:24+5:30
बॉलिवूडची आयटम गर्ल आणि तेलगू इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री मुमैत खान हैदराबाद येथील हाय-प्रोफाइल ड्रग्ज रॅकेटमध्ये संशयित असल्याचे आढळून आले ...
com.jpg)
Shocking : ड्रग्ज प्रकरणात आयटम गर्ल मुमैत खानची एसआयटी करणार चौकशी!
ब लिवूडची आयटम गर्ल आणि तेलगू इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री मुमैत खान हैदराबाद येथील हाय-प्रोफाइल ड्रग्ज रॅकेटमध्ये संशयित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तिला विशेष चौकशी पथकाला (एसआयटी) सामोरे जावे लागणार आहे. मुमैत बिग बॉस तेलगू रिअॅलिटी शोच्या पहिल्या सिजनमध्ये सहभागी होणार आहे. सूत्रानुसार मुमैतला हैदराबाद येथे चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे तिला बिग बॉसचा शो सोडावा लागल्याचे समजते.
सलमान खान, अक्षयकुमार, संजय दत्त यांसारख्या सुपरस्टार्सबरोबर काम केलेल्या आयटम गर्ल मुमैत खानसह जवळपास ११ लोकांना एसआयटीने समन्स बजावला आहे. मुमैत साउथमध्ये चांगलीच फेमस आहे. मुमैतने १५ हिंदी, तेलगू, तामीळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर सलमानसोबत ‘लकी’, संजय दत्तबरोबर ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये काम केले आहे. तसेच मुमैतने आतापर्यंत १२० पेक्षा अधिक हिट आयटम नंबर केले आहेत.
मुमैत २७ जुलैपासून सुरू होत असलेल्या ‘बिग बॉस’च्या तेलगू व्हर्जनमध्ये बघावयास मिळणार आहे. मात्र आता तिला हैदराबाद येथे एसआयटीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. मुमैतला एनडीपीएस अॅक्सच्या सेक्शन ६७ प्रमाणे समन्स बजावण्यात आला आहे. मुमैत गेल्या १६ वर्षांपासून बॉलिवूडमध्ये अॅक्टिव्ह आहे. यादरम्यान तिचा लुक पूर्णत: बदलला आहे.
![]()
२७ लाखांची सर्जरी
मुमैतने एका मुलाखतीत म्हटले होते की, ती चार लोकांबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेली आहे. मात्र तिचे नाते कोणासोबतही फार काळ टिकले नाही. मुमैतने म्हटले की, मी माझ्या रिलेशनसाठी एक सर्जरी केली होती. या सर्जरीसाठी २७ लाख रुपये खर्च आला होता. या सर्जरीत माझ्या डोक्यात ९ महागडे टायटेनियम तार बसविण्यात आलेले आहेत. मात्र आता मी रिलेशनसाठी पैसे वेस्ट करण्याच्या विचारात नाही.