shocking!! ​त्या काळात इलियाना डिक्रूजच्या मनात रोज यायचे आत्महत्येचे विचार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 11:04 IST2017-11-06T05:34:46+5:302017-11-06T11:04:46+5:30

पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर असे सगळे काही देणाºया बॉलिवूड इंडस्ट्रीची एक काळी बाजूही आहे. होय,  इंडस्ट्रीत चालताना टप्प्याटप्प्यांवर नैराश्याची मुक्कामेही ...

shocking !! During that period, Ilya Dikruja's thoughts come to mind everyday! | shocking!! ​त्या काळात इलियाना डिक्रूजच्या मनात रोज यायचे आत्महत्येचे विचार!

shocking!! ​त्या काळात इलियाना डिक्रूजच्या मनात रोज यायचे आत्महत्येचे विचार!

सा, प्रसिद्धी, ग्लॅमर असे सगळे काही देणाºया बॉलिवूड इंडस्ट्रीची एक काळी बाजूही आहे. होय,  इंडस्ट्रीत चालताना टप्प्याटप्प्यांवर नैराश्याची मुक्कामेही आहेत. ही मुक्कामे पार करून जो पुढे जातो, तो इंडस्ट्रीत तरतो. अन्य नैराश्याच्या गर्तेत सापडून पार उन्मळून पडतात. आत्ताआत्तापर्यंत डिप्रेशन हा विषय लोक टाळायचे. पण आता लोक यावर मोकळेपणाने बोलू लागले आहे. अलीकडे बॉलिवूडच्या अनेकांनी डिप्रेशन या विषयावर स्वत:चे धक्कादायक अनुभव शेअर केले आहेत. दीपिका पादुकोण, टायगर श्रॉफ आदी डिप्रेशनवर बोलले आहेत. आता बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिने सुद्धा डिप्रेशनवर एक मोठा खुलासा केला आहे. होय, डिप्रेशन एकदम वास्तव आहे, असे इलियाना म्हणाली. कारण इलियाना स्वत: या अनुभवातून गेली आहे.
अलीकडे २१ व्या मेंटल हेल्थ काँग्रेसमध्ये इलियाना सहभागी झाली. यावेळी तिने आपले हे अनुभव सर्वांशी शेअर केलेत. मी एकेकाळी डिपे्रशनची शिकार ठरले होते. त्या काळात माझ्या मनात रोज आत्महत्येचे विचार यायचे. मी कायम माझ्या शरिराबद्दल विचार करायची आणि स्वत:तील कमतरता बघून निराश व दु:खी व्हायची. याचे कारण मला नंतर कळले. याचे कारण मी डिप्रेशन आणि बॉडी डिस्मॉर्फिक डिसआॅर्डरची रूग्ण होते. मला कुणीच स्वीकारणार नाही, असे मला कायम वाटत राहायचे. मी स्वत:ला स्वीकारणे सुरु केले आणि अर्धी लढाई जिंकली. डिप्रेशन कुठलाच भ्रम नाही. तर ते मेंदूतील एक रासायनिक असंतुन आहे आणि यावर उपचार गरजेचे आहेत. पायाला इजा झाली की, तुम्ही डॉक्टरकडे जाता. अगदी त्याचप्रमाणे डिप्रेशनवरही उपचारांची गरज आहे, असे ती म्हणाली.

ALSO READ: ​इलियाना डिक्रूज पोहोचली फिजीतील बेटावर...पाहा काही कूल फोटो!

साऊथची मोठी स्टार असलेल्या इलियानाने २०१२ मध्ये आलेल्या ‘बर्फी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केले होते. यानंतर ‘फटा पोस्टर निकला हिरो’,‘मैं तेरा हिरो’,‘हॅपी एन्डिंग’,‘रूस्तम’ अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. अलीकडे अजय देवगणसोबत ‘बादशाहो’ या चित्रपटात ती दिसली होती.

Web Title: shocking !! During that period, Ilya Dikruja's thoughts come to mind everyday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.