Shocking! दिवसाढवळ्या या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला कॅब ड्रायव्हरने केले कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 07:23 PM2019-03-26T19:23:23+5:302019-03-26T19:26:17+5:30

बॉलिवूडमधील अभिनेत्रीला एका भयानक घटनेला सामोरे जावे लागले. कॅब ड्रायव्हरने पैशांसाठी तिला कैद करून ठेवले होते.

Shocking! Captured by the CAB driver, a famous actress of the day, | Shocking! दिवसाढवळ्या या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला कॅब ड्रायव्हरने केले कैद

Shocking! दिवसाढवळ्या या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला कॅब ड्रायव्हरने केले कैद

googlenewsNext

लिपस्टिक अंडर माय बुरखा फेम अभिनेत्री अहाना कुमरासोबत नुकतेच असे काही घडले जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. यावेळी ती चित्रपटासाठी नाही तर एका घटनेमुळे चर्चेत आली आहे. दिवसाढवळ्या एका कॅब ड्रायव्हरने त्याच्या भाड्यासाठी तिला गाडीत बंद करून ठेवले होते. या घटनेची माहिती तिने ट्विटरवर दिली आहे.


अहाना शिमलावरून चंडीगडला जात होती. यावेळी तिने मेक माय ट्रीप अॅपच्या माध्यमातून कॅब बुक केली होती. तिने त्या दिवसाचे पैसे दिले होते. मात्र कॅब ड्रायव्हरचे म्हणणे होते की मेक माय ट्रीपकडून त्याला अद्याप पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे कॅब ड्रायव्हरने रस्त्यात कित्येक तास गाडी थांबवून जोपर्यंत त्याला पैसे मिळाले नाहीत तोपर्यंत तिला कैद करून ठेवले होते.
या काळात अहाना ऑनलाइन होती व तिने ट्विटद्वारे ही घटना सांगितली. तिने लिहिले की, कॅब सर्विसकडून ड्रायव्हरला पैसे मिळाले नाही म्हणून रस्त्यात मध्येच गाडी थांबवून गाडीत मला बंद केले आहे. हे सुरक्षित नाही. या ट्विटसोबत तिने मेक माय ट्रीपला टॅग केले.






आणखीन एक ट्विट करत तिने सांगितले की, जर ही मुंबई किंवा दिल्ली असती तर नक्कीच मी ही कॅब कॅन्सल केली असती. मात्र हे शिमला आहे आणि इथे पटकन वाहने मिळत नाहीत. त्यामुळे मी ही राईड कॅन्सल करू शकले नाही. मेक माय ट्रीप तुमची सर्विस खूप वाईट आहे. कुणीही या सर्विसचा वापर नाही केला पाहिजे.



 

अहानाची ही ट्रीप भयानक होती. पण अखेर ती सुरक्षित अमृतसरला पोहचली. ही माहितीदेखील तिने ट्विटरवर दिली आणि सोबत मेक माय ट्रीपला बायकॉट करण्याचे आवाहनही केले.



 

Web Title: Shocking! Captured by the CAB driver, a famous actress of the day,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.