Shocking : कोयना मित्रासोबत अज्ञात व्यक्तीने फोनवर साधला अश्लील संवाद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 13:50 IST2017-08-01T07:53:24+5:302017-08-01T13:50:35+5:30

बॉलिवूडमधून गेल्या काही काळापासून गायब असलेली अभिनेत्री कोयना मित्रा हिच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. होय, कोयनाशी फोनवर ...

Shocking: An anonymous person communicates with a friend on the phone with a friend. | Shocking : कोयना मित्रासोबत अज्ञात व्यक्तीने फोनवर साधला अश्लील संवाद !

Shocking : कोयना मित्रासोबत अज्ञात व्यक्तीने फोनवर साधला अश्लील संवाद !

लिवूडमधून गेल्या काही काळापासून गायब असलेली अभिनेत्री कोयना मित्रा हिच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. होय, कोयनाशी फोनवर अज्ञात व्यक्तीने अश्लील भाषेत संवाद साधला गेल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. कोयनाने याबाबत ओशिवारा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस याप्रकरणी कसून तपास करीत आहेत. 

उपलब्ध माहितीनुसार, गेल्या रविवारी कोयना तिच्या दैनंदिन कामात व्यस्त होती. सायंकाळी सुमारे ५.३० वाजता तिच्या मोबाइलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. कोयनाने फोन रिसिव्ह करताच संबंधित व्यक्तीने अश्लील भाषेत संवाद साधण्यास सुरुवात केली. त्या व्यक्तीने स्वत:चा कुठलाही परिचय न देता कोयनाला ‘तुझ्याशी रात्र घालवायची आहे’ असे म्हटले. कोयनाने जेव्हा त्याला फटकारायला सुरुवात केली तेव्हा त्याने अतिशय अश्लाघ्य भाषेत शिवगाळ केली. तसेच काही मिनिटांनंतर फोन कट केला. त्यानंतर कोयनाने थेट ओशिवारा पोलीस ठाणे गाठत तिचे यौन शोषण करण्याचा प्रयत्न केला गेल्याची तक्रार नोंदविली.

याविषयी ओशिवारा पोलिसांनी सांगितले की, कलम ५०९ नुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा कसून तपास केला जात असून, लवकरच संबंधित आरोपीला अटक करण्यात येईल. दरम्यान, पोलिसांनी याकरिता एक स्वतंत्र पथक नेमले असून, सायबर गुन्हे शाखेची मदत घेतली जात आहे. कोयनाच्या मोबाइलमधील रेकॉर्डेड संभाषणही पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर पोलिसांना काही महत्त्वपूर्ण पुरावे मिळाल्याने लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळल्या जातील असे बोलले जात आहे. 

Web Title: Shocking: An anonymous person communicates with a friend on the phone with a friend.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.