Shocking ! ​ऐश्वर्या राय बच्चन माझी आई; २९ वर्षीय युवकाने केला दावा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 14:03 IST2018-01-03T07:48:11+5:302018-01-03T14:03:12+5:30

सेलिब्रिटी असण्याचे फायदे आहेत तसेच तोटेही. सेलिब्रिटींबद्दलच्या वेगवेगळ्या भल्या-बु-या बातम्या आवडीने चघळल्या जातात. अनेक बातम्या तर सेलिब्रिटींना मीडियातून माहित ...

Shocking! Aishwarya Rai Bachchan is my mother; 29-year-old youth claimed that !! | Shocking ! ​ऐश्वर्या राय बच्चन माझी आई; २९ वर्षीय युवकाने केला दावा!!

Shocking ! ​ऐश्वर्या राय बच्चन माझी आई; २९ वर्षीय युवकाने केला दावा!!

लिब्रिटी असण्याचे फायदे आहेत तसेच तोटेही. सेलिब्रिटींबद्दलच्या वेगवेगळ्या भल्या-बु-या बातम्या आवडीने चघळल्या जातात. अनेक बातम्या तर सेलिब्रिटींना मीडियातून माहित पडतात. काही बातम्या तर अशा असतात की, त्या ऐकून-वाचून हसावे की रडावे, हेही अनेकदा सेलिब्रिटींना कळत नाही. सध्या ऐश्वर्या राय बच्चन हिची स्थितीही यापेक्षा वेगळी नसेल. याला कारणही तसेच आहे. होय, आंध्र प्रदेशातील एका २९ वर्षीय युवकाने ऐश्वर्या राय बच्चन ही माझी आई आहे, असा  दावा केला आहे. ऐश्वर्याने आयव्हीएफ तंत्राद्वारे लंडनमध्ये आपल्याला जन्म दिला आणि दोन वर्षांपर्यंत ऐश्वर्याच्या माता-पित्यांनी आपले पालन पोषण केले, असा दावा या युवकाने केला आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय दोघांमध्येही मतभेद विकोपाला गेले आहेत आणि सध्या दोघेही वेगवेगळे राहतात, असा दावाही या युवकाने केला आहे. अर्थात आपले हे दावे सिद्ध करणारे कुठलेही पुरावे या युवकाकडे नाही.



संगीत कुमार असे या युवकाचे नाव आहे. १९८८ मध्ये माझा जन्म झाला.यानंतर ऐश्वर्याचे आईवडिल वृंदा राय आणि कृष्णराज राय यांनी माझे पालनपोषण केले. यापश्चात आदिवेलू रेड्डी यांनी (युवकाचे वडील) मला विशाखापट्टणमला आणले. तेव्हापासून मी इथेच राहतोय, असे संगीत कुमारचे म्हणणे आहे. तूर्तास ऐश्वर्याने या प्रकरणावर कुठलेही बयान दिलेले नाही. सध्या तरी हे सगळे प्रकरण पब्लिसिटी स्टंट यापेक्षा वेगळे वाटत नाहीय.  

ALSO READ : SEE PICS : ​एक क्षणही अभिषेकला दूर करायला तयार नव्हती ऐश्वर्या राय बच्चन!!

ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चनने २००७ मध्ये लग्न केले होते. या दोघांना आराध्या नावाची सहा वर्षांची मुलगी आहे. अलीकडे एका मुलाखतीत ऐश्वर्या आराध्याबद्दल बोलली होती. सध्या माझे अख्खे आयुष्य आराध्यापुरते मर्यादीत झाले आहे. माझा अख्खा दिवस तिच्याभोवती फिरत असतो. तिच्या जन्माआधी मी कशी जगत होते, हेच आता मला कळत नाही, असे ऐश्वर्या म्हणाली होती.
आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या राय बच्चन ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये दिसली होती. लवकरच ती ‘फन्ने खान’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहेत.
 

Web Title: Shocking! Aishwarya Rai Bachchan is my mother; 29-year-old youth claimed that !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.