Shocking ! एक अनोळखी मुलासोबत लाँग ड्राइव्हवर गेली होती कृती खरबंदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 14:00 IST2018-01-13T05:58:31+5:302018-01-13T14:00:53+5:30
बॉलिवूड अभिनेत्री कृती खरबंदा सध्या यमला पगला दीवानाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ती या चित्रपटात बॉबी देओलच्या सोबत दिसणार आहे. ...

Shocking ! एक अनोळखी मुलासोबत लाँग ड्राइव्हवर गेली होती कृती खरबंदा
ब लिवूड अभिनेत्री कृती खरबंदा सध्या यमला पगला दीवानाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ती या चित्रपटात बॉबी देओलच्या सोबत दिसणार आहे. कृतीने चित्रपट राज रीबूटमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. काही दिवसांपूर्वी कृती चित्रपट 'शादी में जरुर आना'मध्ये दिसली होती. याचित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. या चित्रपटात तिच्या सोबत राजकुमार रावहि दिसला होता. विनोद बच्चन आणि सौंदर्या प्रॉडक्शनद्वारा या चित्रपटाची निर्मिती केली होती. रत्ना सिन्हाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. कमल पांडे यांनी याची पटकथा लिहिली होती. याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कृतीने एक किस्सा सांगितला होता. कदाचित तो खूप कमी जणांना माहिती असेल. कृती एकदा एका लग्नात आपल्या आई-वडिलांबरोबर गेली होती. त्याठिकाणी एक मुलगा तिच्यावर लट्टू झाला होता. लग्नाच्या मधूनच कृती त्या अनोळखी मुलासोबत लॉग्न ड्राइव्हला निघून गेली. लग्नाच्या मध्येच कृतीच्या जवळ येऊन त्या मुलांने तिला लॉग्न ड्रायव्ह येणार का असे विचारले ? कृतीला हा तो मुलगा आवडला होता.कृती त्याच्यासोबत आईला न सांगता लॉग्न ड्रायव्हर निघून गेली. काही वेळानंतर कृतीच्या आईचा तिला फोन आला. त्यावेळी कृती आईशी खोट बोलली. आईने कृतीला कुठे आहेस असे विचारले असता तिने बाथरुममध्ये असलयाचे सांगितले. आईने तिला तडक लग्नाच्या ठिकाणी ग्राऊंडमध्ये बोलावले, कृतीने मग लगेच त्या मुलाला परत सोडण्यास सांगितले. ज्या मुलाच्या लग्नात कृती आली होती तो त्या मुलाचा भाऊ असल्याचे ही तिने सांगितले. कृतीने तेलुगू चित्रपटातून आपल्या करिअची सुरुवात केली होती. तसेच ‘गेस्ट इन लंडन' या चित्रपटात सुद्धा ती दिसली होती. यात तिने अनाया पटेल नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी आपली कमला दाखवू शकला नव्हता.
ALSO READ : Bigg Boss 11 : ‘या’ अभिनेत्रीला हिना खानच्या कानाखाली माराविशी वाटते चापट, पण का?
काही दिवसांपूर्वी कृतीने बिग बॉसच्या घरातील स्पर्धक हिना खान हिचा चांगलाच समाचार घेतला होता. हिनाने ‘साउथच्या अभिनेत्री खूपच स्थूल असतात.’ असे वक्तव्य केले होते. यावर कृती चांगलीच संतापली होती.
ALSO READ : Bigg Boss 11 : ‘या’ अभिनेत्रीला हिना खानच्या कानाखाली माराविशी वाटते चापट, पण का?
काही दिवसांपूर्वी कृतीने बिग बॉसच्या घरातील स्पर्धक हिना खान हिचा चांगलाच समाचार घेतला होता. हिनाने ‘साउथच्या अभिनेत्री खूपच स्थूल असतात.’ असे वक्तव्य केले होते. यावर कृती चांगलीच संतापली होती.