शिल्पाच्या 'त्या' साडीची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 17:12 IST2018-01-17T11:42:31+5:302018-01-17T17:12:35+5:30

‘दिलवालों के दिल का करार लूटने’ असं म्हणत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या सोशल मीडियावर चर्चेत ...

Shilpa's 'Sa' sari talk | शिल्पाच्या 'त्या' साडीची चर्चा

शिल्पाच्या 'त्या' साडीची चर्चा

िलवालों के दिल का करार लूटने’ असं म्हणत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती गेल्या बऱ्याच काळापासून चित्रपट विश्वात सक्रिय नाही. पण, तरीही रिअॅलिटी शोच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येते. त्याशिवाय फिटनेस, योगविषयीसुद्धा ती चाहत्यांना टीप्स देतच असते. बॉलिवूड वर्तुळात आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना हजेरी लावत, सोशल मीडियावर त्याविषयीचे काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करतही शिल्पा तिचे ‘फॅशन गोल्स’ सर्वांसमोर ठेवतेय. अशाच एका कार्यक्रमासाठी गेलेल्या शिल्पाच्या स्टाईल स्टेटमेंटवर फॅशन जगताच्या नजरा खिळल्या आहेत.

साडी हा महिला वर्गात सर्वाधिक पसंती मिळणारा पोशाख आहे. गेल्या काही वर्षांमध्ये साडीमध्येही काही कलात्मक प्रयोग करत फॅशन डिझायनर्सने किमया केल्याचे पाहायला मिळाले. त्याचीच एक झलक शिल्पाच्या साडीतही पाहायला मिळाली. कारण तिने एका कार्यक्रमासाठी चक्क मेटॅलिक साडी नेसली होती. या लूकमध्ये शिल्पाने ट्राऊजर साडीसोबत फ्यूजन कॉम्बो केला होता. किरण उत्तम घोष या फॅशन डिझायनरने ही साडी डिझाईन केली होती. ‘अँटिक सिल्व्हर मेटॅलिक साडी’, असे या साडीचे नाव असून, शिल्पावर ती अगदी सुरेख दिसत होती. सोशल मीडियावर रंगणाऱ्या चर्चांमध्ये या साडीची किंमत ४० हजारांच्या घरात असल्याचे म्हटले जातेय. साडीची खरी किंमत काय हे मात्र अद्यापही उघड झालेले नाही.

मेटॅलिक साडीतील शिल्पाचे स्टायलिंग सेलिब्रिटी स्टायलिस्ट मोहित रायने केले होते. तर साडीवर शिल्पाने घातलेले अलंकार रेनी ऑबेरॉयने डिझाईन केले होते. शिल्पाचा हा लूक सोशल मीडियावर अनेकांचीच मनं जिंकून गेला. तेव्हा आता या बी टाऊन स्टाईल आयकॉनपासून प्रेरित होऊन कितीजणी मेटॅलिक साडीचा ट्रेंड फॉलो करतात हे येत्या काळात कळेलच. पण, फॅशन जगतातील ही प्रयोगशीलता खरंच कौतुकास्पद आहे असे म्हणायला हरकत नाही.


सुपर डान्सर २’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सलमानने त्याच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. या शोमध्ये शिल्पा परीक्षक आहे. याच कार्यक्रमात सलमान आणि शिल्पा शेट्टीने   आपल्या डान्स स्टेप्सविषयी सांगताना  वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावणाºया जातिवाचक शब्दाचा वापर केला होता. मी या स्टे्प्समध्ये ‘भंगी’ दिसेल, असे सलमान म्हणाला होता. यावर, मी घरी अशीच दिसते, असे शिल्पा म्हणाली होती. यामुळे वाल्मीकी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या.  शिल्पा आणि सलमानने वाल्मिकी समाजाची जाहीर माफी मागावी आणि त्यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणीदेखील या समाजाने केली होती.

 

Web Title: Shilpa's 'Sa' sari talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.