चप्पल न काढताच फडकवला तिरंगा, शिल्पा शेट्टीला नेटकऱ्यांनी दाखवला नियमांचा आरसा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 12:34 PM2023-08-16T12:34:36+5:302023-08-16T12:35:46+5:30

शिल्पा शेट्टीने वर ट्रोलर्सचीच केली कानउघाडणी. काय म्हणाली अभिनेत्री?

shilpa shetty trolled for hoisting the indian flag with footwear put on gives reply to trollers | चप्पल न काढताच फडकवला तिरंगा, शिल्पा शेट्टीला नेटकऱ्यांनी दाखवला नियमांचा आरसा

चप्पल न काढताच फडकवला तिरंगा, शिल्पा शेट्टीला नेटकऱ्यांनी दाखवला नियमांचा आरसा

googlenewsNext

काल सगळीकडेच १५ ऑगस्ट 'स्वातंत्र्यदिन' उत्साहात साजरा झाला. अनेकांनी देशप्रेम व्यक्त करत घरी, शाळा कॉलेज, कार्यालयांमध्ये तिरंगा फडकवला. सोशल मीडियावर देशासाठीचं प्रेम उफाळून आलं. सेलिब्रिटींनीही आपापल्या घरी कुटुंबासोबत झेंडा फडकवून फोटो, व्हिडिओ पोस्ट केले. शाहरुख खान, कॅटरिना कैफ सह इतर अनेक कलाकारांनी स्वातंत्र्य दिवस साजरा केला. दरम्यान शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) चप्पल न काढताच झेंडा फडकवल्याने तिला चांगलंच ट्रोल केलं गेलं. यावर शिल्पाने ट्रोलर्सचीच कानउघाडणी केली आहे.

शिल्पा शेट्टीने काल आपल्या कुटुंबासोबत स्वातंत्र्यदिन साजरा केला. दोन्ही मुलं आणि आईसोबत तिने घराखालीच झेंडा फडकवला. यावेळी सगळ्यांच्याच पायात चप्पल होती. शिल्पाने चप्पल न काढताच तिरंगा फडकवल्याने तिला ट्रोल केले गेले. 'चप्पल तरी काढायला हवी होती' असं म्हणत सोशल मीडियावर तिच्यावर टीका होऊ लागली. 

ट्रोलर्सकडे एरवी दुर्लक्ष करणाऱ्या शिल्पाने यावेळी मात्र त्यांना सडेतोड उत्तर दिले. ट्वीट करत तिने लिहिले, 'झेंडा फडकवतानाचे सर्व नियम मला माहित आहेत. देश आणि तिरंग्याचा मी मनापासून सम्मान करते प्रश्न विचारण्यासाठी नाही. मला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. आजची पोस्ट तीच भावना साजरा करण्यासाठी केली आहे. इतर दिवशी मी सहसा ट्रोलर्सला इग्नोर करते पण आज नाही. म्हणून तुम्हीच तुमचे तथ्य तपासा.'

शिल्पा ध्रुव सरजाच्या आगामी सिनेमात झळकणार आहे. 'केडी:द डेविल' असं सिनेमाचं नाव आहे. याद्वारे ती १८ वर्षांनंतर कन्नड सिनेमात पुनरागमन करत आहे. याशिवाय ती रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या ओटीटी शोमध्येही दिसणार आहे.

Web Title: shilpa shetty trolled for hoisting the indian flag with footwear put on gives reply to trollers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.