शिल्पा शेट्टीने लेक समिषाचा फोटो केला शेअर!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 18:09 IST2020-05-17T18:08:41+5:302020-05-17T18:09:10+5:30

शिल्पा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे फिटनेस फंडे चाहत्यांना सांगत असते. यात बरोबरच ती अनेकदा योगा करतानाचे किंवा कुटुंबियांसोबतचे फोटो, व्हिडीओही शेअर करत असते.

Shilpa Shetty shared a photo of Lake Samisha !! | शिल्पा शेट्टीने लेक समिषाचा फोटो केला शेअर!!

शिल्पा शेट्टीने लेक समिषाचा फोटो केला शेअर!!

आजही बॉलिवूडच्या हॉट आणि फिटनेस फ्रिक अभिनेत्रींमध्ये शिल्पा शेट्टीचे नाव घेतले जाते. ती सध्या मोठया पडद्यापासून सध्या दुरावली असली तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र तिच्या चाहत्यांसोबत कनेक्टेड आहे. ती फिटनेस फ्रिक तर आहेच, शिवाय ती आता दोन मुलांची आई झाली आहे. तिची मुलगी नुकतीच ३ महिन्यांची झाली असल्याचे सांगून तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. चाहतेही तिने पोस्ट केलेला हा फोटो लाईक करत आहेत.

 

शिल्पा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे फिटनेस फंडे चाहत्यांना सांगत असते. यात बरोबरच ती अनेकदा योगा करतानाचे किंवा कुटुंबियांसोबतचे फोटो, व्हिडीओही शेअर करत असते. अलिकडेच शिल्पाने तिच्या मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करुन तिने समिषा तीन महिन्यांची झाली असं सांगितलं आहे.

१५ फेब्रुवारी रोजी शिल्पा दुसऱ्यांदा आई झाली. तिने सरोगसीद्वारे एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्या मुलीचं नाव ‘समिषा’ असं असून ती तीन महिन्यांची झाली आहे. त्यामुळेच शिल्पाने तिच्यासोबतचा एक छान फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तिच्यासोबत मुलगा वियानदेखील दिसून येत आहे. ‘तीन महिने झाले अभिनंदन. माझी राजकुमारी समिषा’, असं कॅप्शन शिल्पाने या फोटोला दिला. सध्या नेटकऱ्यांमध्ये या फोटोची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, समिषाचा जन्म १५ तारखेला झाला असून १५ हा आकडा शिल्पासाठी खास असल्याचं तिने अलिकडेच सांगितलं होतं. ‘१५ नंबर माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण १५ फेब्रुवारीला माझ्या मुलीचा जन्म झाला. १५ एप्रिलला ती दोन महिन्यांची झाली आणि त्याच दिवशी माझे टिक-टॉकवर १५ मिलियन फॉलोअर्स झाले आहेत,’ असं शिल्पा म्हणाली होती.

Web Title: Shilpa Shetty shared a photo of Lake Samisha !!