शिल्पा शेट्टी- राज कुंद्राची कंपनी दिवाळखोरीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 18:47 IST2017-02-15T13:17:03+5:302017-02-15T18:47:03+5:30

बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची होम शॉपिंग चॅनल ही कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. कर्मचाºयांना ...

Shilpa Shetty - Raj Kundra Company's Bankruptcy! | शिल्पा शेट्टी- राज कुंद्राची कंपनी दिवाळखोरीत!

शिल्पा शेट्टी- राज कुंद्राची कंपनी दिवाळखोरीत!

लिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची होम शॉपिंग चॅनल ही कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. कर्मचाºयांना पगारही दिला गेला नाही. यामुळे ही कंपनी बंद पडल्यातच जमा आहे. दरम्यान राज कुंद्रा याने ट्विट करीत मी स्वत:ही पगार घेतला नसल्याचे म्हटले आहे. राज कुंद्रा हे कंपनीचे सीईओ असून, त्यांनी पदाचा डिसेंबरमध्येच राजीनामा दिला आहे.
 

नोटबंदीमुळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची ही कंपनी नुकसानीत आहे. कंपनीला मोठ्या प्रमाणावर तोटा झाला आहे. या कंपनीत काम करणाºया कर्मचाºयाच्या अनुसार गेल्या एक नोव्हेंबरपासून काहीही काम नाही. त्यामुळे नोटबंदीमुळे कंपनी तोट्यात गेली कसे म्हणता येईल. नोव्हेंबर महिन्याचा अर्धाच पगार देण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत आम्ही भेटण्याचा प्रयत्न करीत आहोत, मात्र कंपनीचे अधिकारी भेटत नाहीत. यामुळे आमचे कुटुंब उघड्यावर आल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. 
या कंपनीचे सीओओ हरीकृष्ण त्रिवेदी यांच्या अनुसार, ‘कॅशलेसमुळे व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे कंपनी स्वत:चे खर्च करण्यास असमर्थ आहे. कर्मचाºयांचे म्हणणे चुकीचे आहे. आम्ही ५० टक्के पगार दिला आहे. उर्वरित ५० टक्के पगार आम्ही ३१ मार्च पर्यंत देणार आहोत. कंपनी ९० दिवसात संपूर्ण पगार देणार आहे. 
राज कुंद्रा यानेही ट्विट करून केवळ मीच नाही तर हरीकृष्ण यांनीही पगार घेतलेला नाही. कृपया चुकीच्या बातम्या देऊ नका असे म्हटले आहे.
 

Web Title: Shilpa Shetty - Raj Kundra Company's Bankruptcy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.