शर्लिन चोप्रा म्हणते, ‘ती मी नव्हेच....’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 13:07 IST2016-08-05T07:37:02+5:302016-08-05T13:07:02+5:30
अभिनेत्री शर्लिन चोप्राने ‘कामसुत्रा थ्रीडी’त मी काम केले नसल्याचे सांगून, ‘ती मी नव्हेच...’ अशी भुमिका घेतली आहे. ती एका ...
.jpg)
शर्लिन चोप्रा म्हणते, ‘ती मी नव्हेच....’
'कामसुत्रा थ्रीडी'चा अधिकृत ट्रेलर २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात शर्लिन बोल्ड सीनमध्ये दिसली होती.
शर्लिन चोप्राने 'कामसुत्रा थ्रीडी'चा दिग्दर्शक रुपेश पॉलवर केस दाखल केल्यानंतर चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. लैंगिक सुखाला नकार दिल्यामुळे पॉलने तिचे मानधन रोखल्याबद्दलची केस शर्लिनने दाखल केली होती. रुपेश पॉलनेही शर्लिनवर अब्रु नुकसानीची दावा दाखल केला होता. मात्र नंतर दोघांनीही हा प्रश्न सामोपचाराने सोडवला होता.
शर्लिनला तिच्या आगामी कामाविषयी विचारले असता ती म्हणाली, '' मी माझ्या शॉर्ट फिल्मचे शूटींग सुरू केले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ही शॉर्ट फिल्म मला रिलीज करायची आहे. लेखिका, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री म्हणून ही माझी पहिलीच शॉर्ट फिल्म आहे.''