शहनाज गिल गुरू रंधावाला करतेय डेट?, अभिनेत्रीच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळाली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 07:13 PM2024-01-03T19:13:38+5:302024-01-03T19:13:55+5:30

Shehnaaz Gill : बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल सर्वत्र चर्चेत आहे. ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Shehnaaz Gill is dating Guru Randhawa?, fans got a hint from the post of the actress | शहनाज गिल गुरू रंधावाला करतेय डेट?, अभिनेत्रीच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळाली हिंट

शहनाज गिल गुरू रंधावाला करतेय डेट?, अभिनेत्रीच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळाली हिंट

बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) सर्वत्र चर्चेत आहे. ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. शहनाजने 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. सध्या शहनाज तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ती गायक गुरु रंधावा(Guru Randhawa)ला डेट करत असल्याची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसतात आणि सोशल मीडियावर एकमेकांसोबतच्या पोस्टही शेअर करत असतात.

शहनाज गिल आणि गुरु रंधावा यांचा मूनराईज म्युझिक व्हिडिओ एकत्र आला होता जो लोकांना खूप आवडला होता. मूनराईजच्या यशानंतर गुरु आणि शहनाज पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. त्यांनी त्यांच्या गाण्याचे पोस्टर शेअर केले आहे. त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

शहनाजने तिच्या आगामी सनराइज गाण्याचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करताना तिने लिहिले की, 'हे फक्त एक गाणे नाही तर एक सुंदर भावना आहे जी आपण एकत्र जपतो. इतक्या प्रेमाबद्दल धन्यवाद. सूर्योदय नेहमी चंद्रोदयानंतर होतो. शहनाजची ही पोस्ट लगेच व्हायरल झाली. या दोघांच्या नात्याबद्दल चाहते बोलत आहेत.

चाहत्यांनी केली कमेंट
शहनाज गिलच्या पोस्टवर चाहते खूप कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, तुम्हाला आणि गुरूला एकत्र पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. तर दुसर्‍याने लिहिले की, या अद्भुत जोडप्यासह नवीन वर्षाची उत्तम सुरुवात.

वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, शहनाज गिल शेवटची भूमी पेडणेकरसोबत थँक यू फॉर कमिंग या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अनिल कपूर, कुशा कपिला, डॉली सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Web Title: Shehnaaz Gill is dating Guru Randhawa?, fans got a hint from the post of the actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.