Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 11:48 IST2025-09-02T11:46:57+5:302025-09-02T11:48:25+5:30

Mrunal Thakur on Anushka Sharma: अभिनेत्री मृणाल ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याआधी बिपाशा बासूला बॉडी शेमिंग करतानाचा तिचा जुना व्हिडिओ समोर आला होता. यावेळी ती अनुष्का शर्माबद्दल बोलत आहे.

''She doesn't work, but I...'', Mrunal Thakur targets Anushka Sharma? Claims she rejected Salman Khan's 'Sultan' | Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा

Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा

Mrunal Thakur Viral Interview: अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यापूर्वी सलमान खान(Salman Khan)सोबत 'सुलतान' (Sultan Movie) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती, परंतु नंतर अनुष्का शर्मा(Anushka Sharma)ने तिची जागा घेतली. आता मृणालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती चित्रपट नाकारण्याबद्दल बोलत आहे आणि असेही म्हणत आहे की, त्या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री सध्या काम करत नाही. मृणालने कोणाचेही नाव घेतले नाही, परंतु नेटिझन्स तिच्यावर टीका करत आहेत, कारण त्यांना वाटतंय की अभिनेत्रीने अनुष्काला टार्गेट केले आहे.

व्हायरल व्हिडीओत मृणाल ठाकूर 'सुलतान' नाकारल्याचं आणि अनुष्का शर्माकडे काहीच काम नसल्याबद्दल बोलत आहे. ती म्हणाली की, ''मी खरंच 'सुलतान' नाकारला, कारण मी तयार नव्हती. हा सिनेमा सुपरहिट झाला आणि अभिनेत्रीला तिथंपर्यंत पोहचण्यासाठी मदत मिळाली. मात्र नंतर मला जाणवलं की जर मी त्यावेळी तो चित्रपट केला असता तर मी स्वतःला गमावलं असतं.''

'सुलतान' अभिनेत्री करत नाहीये काम 
ती पुढे म्हणाली, ''ती (सुलतान अभिनेत्री) सध्या काम करत नाहीये, पण मी काम करत आहे, हा स्वतःचा विजय आहे, कारण मला झटपट समाधान, झटपट ओळख, झटपट लोकप्रियता नको आहे, कारण जे तुम्हाला लगेच मिळते ते लगेच निघून जाते.''

मृणालवर होतेय टीका 
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मृणाल ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. नेटकरी तिच्यावर टीका करत आहेत. एकाने लिहिले, ''पीक मीन गर्ल एनर्जी - ती आज काम करत नाहीये, पण मी आहे. स्वतःबद्दल चांगले वाटण्यासाठी इतरांना कमी लेखणाऱ्या महिलांचा मी खरोखर आदर करू शकत नाही.'' दुसऱ्याने लिहिले, ''जर हे अनुष्काबद्दल बोलत असेल तर... मृणाल खरोखरच मूर्ख आहे.'' आणखी एकाने म्हटलं की, ''मृणाल कुस्तीगीर दिसली असती आणि तिला या चित्रपटाचा खूप फायदा झाला असता. सलमान आणि अनुष्काची केमिस्ट्री खूप चांगली होती, मृणालने चित्रपट केला नाही हे चांगले झाले.''

बिपाशा बसूचं बॉडी शेमिंग
काही दिवसांपूर्वी मृणाल चर्चेत आली होती. तिचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये ती बिपाशा बसूचे बॉडी शेमिंग करत होती. नंतर मृणालने माफी मागितली.   
 

Web Title: ''She doesn't work, but I...'', Mrunal Thakur targets Anushka Sharma? Claims she rejected Salman Khan's 'Sultan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.