जहान पृथ्वीराज कपूर!! बॉलिवूडमध्ये दिसणार कपूर घराण्यातील आणखी एक हॅण्डसम चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 06:12 PM2021-07-05T18:12:38+5:302021-07-05T18:13:14+5:30

कपूर घराण्याचे फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, कपूर कुटुंबातील आणखी एक चेहरा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे.

shashi kapoor grandson zahaan prithviraj kapoor to mark his bollywood debut | जहान पृथ्वीराज कपूर!! बॉलिवूडमध्ये दिसणार कपूर घराण्यातील आणखी एक हॅण्डसम चेहरा

जहान पृथ्वीराज कपूर!! बॉलिवूडमध्ये दिसणार कपूर घराण्यातील आणखी एक हॅण्डसम चेहरा

googlenewsNext
ठळक मुद्देअद्याप या चित्रपटाच्या नावाची घोषणा झालेली नाही. चित्रपटाची कथा काय असेल, हेही तूर्तास गुलदस्त्यात आहे. 

कपूर घराण्याचे फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, कपूर कुटुंबातील आणखी एक चेहरा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे. हा कोण तर दिवंगत अभिनेते शशी कपूर (Shashi Kapoor) यांचा नातू जहान पृथ्वीराज कपूर (Zahaan Prithviraj Kapoor) . शशी कपूर यांचे पुत्र कुणाल कपूर यांचा मुलगा.
कुणाल कपूर व शीना यांचा मुलगा जहान हंसल मेहता यांच्या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतोय. अनुभव सिन्हा हा सिनेमा प्रोड्यूस करत आहेत. या चित्रपटात आदित्य रावल हा नवा चेहराही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हंसल यांनी आपल्या आगामी सिनेमासाठी जहान व आदित्य यांना खास ट्रेनिंग दिलं आहे. (Shashi Kapoor grandson Zahaan Prithviraj Kapoor to mark his bollywood debut)

अनुभव सिन्हा यांनी अलीकडे या सिनेमाबद्दल सांगितले. ‘ जहान व आदित्य आपल्या डेब्यू सिनेमासाठी प्रचंड उत्सुक आहेत. त्यांच्याइतकेच आम्हीही उत्सुक आहोत. दोघांनीही या सिनेमासाठी अगदी जीवतोड मेहनत केलीये. आम्हाला या चित्रपटासाठी दोन नव्या चेहºयांचा शोध होता. प्रेक्षकांना पडद्यावर एक कॅरेक्टर पाहण्याचा फिल यावा, हा आमचा विचार होता. आम्ही शूटींग सुरू केले आहे आणि आदित्य व जहान ज्या पद्धतीने काम करताहेत, ते कौतुकास्पद आहे, ’असे सिन्हा म्हणाले.
अद्याप या चित्रपटाच्या नावाची घोषणा झालेली नाही. चित्रपटाची कथा काय असेल, हेही तूर्तास गुलदस्त्यात आहे. 

जहानचे वडील कुणाल कपूर हे शशी कपूर यांचे पुत्र. कुणाल कपूरचे बॉलिवूड करिअर अगदीच लहान ठरले. 1978 मध्ये आलेल्या शशी कपूर स्टारर  ‘जुनूर’मध्ये कुणालने लहानशी भूमिका केली होती. यानंतर 1981 मध्ये पद्मिनी कोल्हापुरेसोबत ‘आहिस्ता आहिस्ता’ मधून डेब्यू केला. हा चित्रपट हिट ठरला. पण कुणाल कपूरला काहीच फायदा झाला नाही.यानंतर त्याचे तीन चित्रपट आलेत. अ‍ॅक्टिंगनंतर त्याने काही काळ प्रॉडक्शनमध्ये हात आजमावला. पृथ्वी थिएटरचे काम सांभाळले. कुणालने रमेश सिप्पीची मुलगी शीनासोबत लग्न केले. मात्र काही वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला होता.

Web Title: shashi kapoor grandson zahaan prithviraj kapoor to mark his bollywood debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.