Shashi Kapoor Bithday Special: सिमी गरेवालसह न्यूड फोटोंमुळेंही झाली होती टीका, चढावी लागली कोर्टाची पायरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 12:43 IST2017-03-18T07:04:04+5:302017-03-18T12:43:52+5:30
हिंदी चित्रपट सृष्टीचा चॉकलेट हिरो... त्याचं चार्मिंग असणं... त्याचं देखणं दिसणं... जो तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला होता.... ज्याला सारं ...

Shashi Kapoor Bithday Special: सिमी गरेवालसह न्यूड फोटोंमुळेंही झाली होती टीका, चढावी लागली कोर्टाची पायरी
ह ंदी चित्रपट सृष्टीचा चॉकलेट हिरो... त्याचं चार्मिंग असणं... त्याचं देखणं दिसणं... जो तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला होता.... ज्याला सारं बॉलीवुड म्हणायचं हॅडसम कपूर... तो हिरो म्हणजे शशी कपूर....शशी कपूर म्हणजे रमादेवी आणि पृथ्वीराज कपूर यांचा 18 मार्च 1938 साली कलकत्यात जन्मलेला तिसरा मुलगा... पाळण्यातलं नाव कपूर खानदानाला साजेसं असं लांबलचक बलबीरराज... पुढं शशी हे प्रेमाचं नाव सा-या जगात गाजलं..
मुंबईतल्या मांटुग्याच्या डॉन बॉस्को शाळेत शशी कपूर याचं शिक्षण झालं. त्यांचे वडिल पृथ्वीराज कपूर हे एक थिएटर आर्टिस्ट होते.. थिएटर कंपनी चालवता चालवता ते सिनेमातही काम करायचे.. शशी कपूर यांचा मोठे बंधू राज कपूर आणि शम्मी यांनीही सिनेमात काम करण्यास सुरुवात केली.
साहजिकच शशी कपूरसुद्धा अभिनयाकडं वळले. त्यांच्या करियरची सुरुवात ही पृथ्वी थिएटरच्या शकुंतला या नाटकाने झाली. 1945 साली के.एल.सैगल आणि सुरैय्या यांच्या तदबीर सिनेमात त्यांनी शशीराज नावाची भूमिका साकारली. त्यानंतर राज कपूर यांच्या आग आणि आवारा या सिनेमात शशी कपूर यांनी छोट्या राज कपूरची भूमिका साकारली.
तदबीरपासून ते 1952च्या दानापानीपर्यंत शशी कपूर यांनी बालकलाकार म्हणून 11 सिनेमांत काम केलं.. त्यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेला छोटा अशोककुमार आणि छोटा राज कपूर सा-यांना भावला. त्यानंतर शशी कपूर वडिल पृथ्वीराज कपूर यांच्या थिएटर कामात रस घेऊ लागले. त्यांच्यासह फिरु लागले आणि थिएटरमध्ये शेक्सपियरसारख्या भूमिका साकारल्या..
पुढे मोठा भाऊ राज कपूरसह सिनेमात रस घेत श्रीमान सत्यवादी आणि दुल्हा दुल्हन सिनेमांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून कामही पाहिलं.कपूर खानदानातला असल्यानं सुरुवातीला शशी कपूर यांना साईन करण्यासाठी निर्माता-दिग्दर्शकांची रांग लागायची.. मात्र शेक्सपियरसारख्या भूमिका साकारल्या असल्याने त्यांच्या डोक्यात आदर्श सिनेमा आणि भूमिकेची कल्पना होती.. मी अभिनेता आहे नाचणारा डोंबारी नाही असं सांगत ते त्यांना नकार द्याचे.. मात्र पुढे जाऊन शशी कपूर यांच्या डान्सिंगवरही रसिक फिदा झाले..हिंदी सिनेमात शशी कपूर यांची एंट्री झाली ती यश चोपडा यांच्या 'धर्मपुत्र' सिनेमातून..
अखेरीस त्यांचं आदर्शवादाचं भूत उतरलं आणि 'एक अनार सौ बिमार' सिनेमा त्यांनी केला. त्याआधी चार दिवारी हा सिनेमा प्रदर्शित झाला.1960 मध्ये शशी कपूर यांनी अनेक रोमँटिक सिनेमात काम केलं. मात्र एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळं मीडियानंही ते अपयशी असल्याचा शिक्का त्यांच्यावर मारला..
त्याकाळी एकही हिरोईन त्यांच्यासह काम करण्यासाठी पुढं येत नव्हती.. अशा परिस्थितीत नंदानं त्यांच्यावर विश्वास दाखवला. सूरज प्रकाश दिग्दर्शित जब जब फूल खिले सिनेमात दोघांची जोडी एकत्र आली आणि ही स्टोरी गोल्डन ज्युबिली ठरली..
'जब जब फूल' खिलेंनंतर मात्र शशी कपूर यांनी मागं वळून पाहिलं नाही...5-5 शिफ्टमध्ये ते काम कुरु लागले. एका स्टुडिओतून दुस-या स्टुडिओत त्यांची धावाधाव व्हायची. 'सत्यम शिवम' सुंदरमच्या वेळी राज कपूर रागाने त्यांना एक्टर हो या टॅक्सी असंही बोलले.. त्यामुळं शशी कपूर यांना टॅक्सी कपूर नाव पडलं....
कधी काळी खांदे उडवत आणि उड्या मारत नाचणारे शशी कपूर यांना व्हीलचेअरवर पाहून अनेकजण हळहळले.. मात्र यश मिळवूनही कायम माणूसकी आणि साधेपणा जपणारा खरा माणूस अशी त्यांची शबाना आझमी यांनी ओळख करुन देताच सा-यांनी टाळ्यांच्या कडकडाटात या हरहुन्नरी अभिनेत्याला सलाम केला..
हिंदीसोबत इंग्रजी सिनेमात काम करण्याची संधी मिळाली... द हाऊसहोल्डर, शेक्सपिअरवाला, बॉम्बे टॉकी, हिट एंड डस्ट असे सिनेमे भारतातच नाहीतर परदेशातही हिट ठरले...'सिद्धार्थ' हा त्यांचा इंग्रजी सिनेमा वादग्रस्तही ठरला.. सिमी गरेवालसह मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या न्यूड फोटोंमुळं त्यांना कोर्टाची पायरीसुद्धा चढावी लागली.
हिंदी चित्रपटाचा इतिहास लिहिताना शशी कपूर यांच्याशिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही.. त्याचं नाव सिनेसृष्टीत नेहमी अभिमानानं घेतलं जाईल...