Shameful : टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटनीच्या बोल्ड लूकवर लट्टू झाली 'ही' व्यक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 22:11 IST2017-02-22T16:38:11+5:302017-02-22T22:11:58+5:30

गेल्या महिन्यात पार पडलेला ६२वा जियो फिल्मफेअर अवॉर्ड नुकताच टीव्हीवर आॅनएयर करण्यात आला आहे. या सोहळ्यात स्टायलिश आउटफिट्स परिधान ...

Shameful: Tiger Shroff's girlfriends direction became 'Bhaag' on Patni's bold look! | Shameful : टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटनीच्या बोल्ड लूकवर लट्टू झाली 'ही' व्यक्ती!

Shameful : टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटनीच्या बोल्ड लूकवर लट्टू झाली 'ही' व्यक्ती!

ल्या महिन्यात पार पडलेला ६२वा जियो फिल्मफेअर अवॉर्ड नुकताच टीव्हीवर आॅनएयर करण्यात आला आहे. या सोहळ्यात स्टायलिश आउटफिट्स परिधान करून अभिनेत्रींनी लावलेली हजेरी डोळे दीपविणारी आहे. सेलेब्सचा हा जलवा सोहळ्याची भव्यता तर दर्शवितोच शिवा प्रेक्षकांना येथेच्छ आनंदही देऊन जातो.
 


अशा या रंगारंग सोहळ्यात पोहचलेली टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटनी विशेष चर्चेत राहिली. खरं तर ती दोन कारणांनी सध्या चर्चेत आहे. एक तर सोहळ्यात तिचा स्टनिंग लूक अन् या लूकवरच फिदा झालेली एक व्यक्ती. आता ही व्यक्ती कोण हे मात्र कोडच आहे. काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या दिशाचा हॉट अ‍ॅण्ड सेक्सी अंदाज अनेकांची बोलती बंद करणारा होता. या ड्रेसमध्ये दिशा खूपच स्टनिंग दिसत असल्याने प्रत्येकांची नजर तिच्यावर खिळून राहत होती. 



एका व्यक्तीने तर हद्दच केली. ती व्यक्ती तिला अशी काही न्याहाळत होती की, आपण कॅमेºयात कैद होतो, याचे भानही त्या व्यक्तीला नव्हते. ती सारखी दिशाकडे बघत होती. मात्र दिशाला ही बाब कदाचित माहिती नसावी. ती सोहळ्यात अशी काही रमली होती की, ही व्यक्ती तिला सारखी बघतोय, हे तिच्या लक्षातच आले नाही.



नुकत्याच रिलीज झालेल्या ‘कुंग फू योगा’ या सिनेमात दिशा बघावयास मिळाली होती. जॅकी चॅन, सोनू सूद, अमायरा दस्तूर यांसारख्या स्टारकास्टबरोबर तिला अभिनय करण्याची संधी मिळाली. या सिनेमाने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला. याअगोदर ती ‘धोनी : द अनटोल्ड स्टोरी’मध्येही झळकली होती. 

Web Title: Shameful: Tiger Shroff's girlfriends direction became 'Bhaag' on Patni's bold look!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.