"आलिया भटपेक्षा श्रद्धा जास्त मानधन घेते", शक्ती कपूर यांचं लेकीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले- "ती खूप हट्टी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 11:17 IST2025-12-25T11:16:19+5:302025-12-25T11:17:09+5:30
श्रद्धाला काम मिळत नसल्याच्या चर्चा सतत होत असतात. याशिवाय आलिया भट आणि अनन्या पांडेसोबत तिची तुलनाही केली जाते. यावर आता शक्ति कपूर यांनी स्पष्टच शब्दांत उत्तर दिलं आहे.

"आलिया भटपेक्षा श्रद्धा जास्त मानधन घेते", शक्ती कपूर यांचं लेकीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले- "ती खूप हट्टी..."
श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री आहे. श्रद्धा ही सुप्रसिद्ध अभिनेते आणि बॉलिवूडचे व्हिलन शक्ती कपूर यांची मुलगी आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत श्रद्धानेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनेक हिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. पण, श्रद्धाला काम मिळत नसल्याच्या चर्चा सतत होत असतात. याशिवाय आलिया भट आणि अनन्या पांडेसोबत तिची तुलनाही केली जाते. यावर आता शक्ति कपूर यांनी स्पष्टच शब्दांत उत्तर दिलं आहे.
शक्ति कपूर यांनी द पावरफूल ह्युमन्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना श्रद्धा कपूरच्या कामाबाबत प्रश्न विचारला गेला. यावेळी त्यांनी श्रद्धाची आलिया आणि अनन्यासोबत होणाऱ्या तुलनेवरही उत्तर दिलं. ते म्हणाले, "श्रद्धा सिनेमे कमी करते. पण जे काही करते ते बेस्ट करते. श्रद्धा वर्षातून एक किंवा दोनच सिनेमे करते. पण ती आलिया भट आणि अनन्या पांडेपेक्षा जास्त पैसे घेते. श्रद्धा खूप हट्टी आहे. तिला जे हवं तेच ती करते. ती तिचे स्वत:चे नियम फॉलो करते".
पुढे ते म्हणाले, "आमच्या बापलेकीत चांगलं बॉण्डिंग आहे. कधी आम्ही भांडतो. कधी आम्ही एकत्र सुट्टीवर जातो. तर कधी आमच्यात सिनेमावर चर्चा होते. मला तिच्यावर गर्व आहे. ती एक चांगली अभिनेत्री आहे". दरम्यान, श्रद्धाने २०१० साली आशिकी २ या सिनेमातून पदार्पण केलं होतं. पहिल्याच सिनेमाने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. श्रद्धाचा पहिलाच सिनेमा हिट ठरला होता. त्यानंतर स्त्री, बाघी, ओके जानू, हाफ गर्लफ्रेंड या सिनेमांमध्ये ती दिसली.