Shehzada : सिनेमासाठी काहीपण! 'शहजादा' कार्तिक आर्यनने परत केली फीस, कारण ऐकून कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 05:02 PM2023-02-17T17:02:17+5:302023-02-17T17:03:03+5:30

'शहजादा' मध्ये कार्तिक आर्यंन अॅक्शन भूमिकेत दिसत आहे.

Shahzada Karthik Aaryan returned the fees taken for film shehzada reveals reason behind it | Shehzada : सिनेमासाठी काहीपण! 'शहजादा' कार्तिक आर्यनने परत केली फीस, कारण ऐकून कराल कौतुक

Shehzada : सिनेमासाठी काहीपण! 'शहजादा' कार्तिक आर्यनने परत केली फीस, कारण ऐकून कराल कौतुक

googlenewsNext

Shehzada :  अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aryan) 'शहजादा' हा सिनेमा आज रिलीज झाला आहे. हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'अला वैकुंठपुरमलू' चा रिमेक आहे. 'शहजादा' मध्ये कार्तिक आर्यंन अॅक्शन भूमिकेत दिसत आहे. अॅक्शन, एंचरटेन्मेंट आणि रोमॅन्स असा फुल मसाला असलेला हा चित्रपट आहे. पण तुम्हाला माहितीए का कार्तिकने शहजादा साठी आकरलेले मानधन परत केले आहे. इतकंच नाही तर मानधन परत करुन तो सिनेमाता सहनिर्माता बनला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत कार्तिकने याचा खुलासा केला आहे.

शहजादाच्या ट्रेलर लॉंचवेळी कार्तिक म्हणाला, मी याआधी शहजादा मध्ये सहनिर्माता म्हणून ऑनबोर्ड नव्हतो.मी मानधन घेतले होते. मात्र सिनेमाच्या बजेटसंदर्भात मोठ्या समस्या होत्या. सिनेमाचे बजेट फार कमी होते. म्हणूनच मी माझी फीस परत केली आणि सिनेमासाठी सहनिर्माता बनलो.'

'फिल्ममध्ये काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या समस्या तुमच्याही असतात. मी नेहमीच पूर्णपणे सिनेमासाठी झटतो. याचे श्रेय निर्मात्यांना जाते ज्यांनी मला निर्माता होण्याची संधी दिली.'

शहजादामध्ये कार्तिक आर्यन शिवाय क्रिती सेनन, परेश रावल, रोनित रॉय आणि परेश रावल यांचीही मुख्य भूमिका आहे. कार्तिकच्या सिनेमाची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. शहजादा याआधी खरं तर १० फेब्रुवारी रोजीच रिलीज होणार होता मात्र 'पठाण'ला मिळत असलेला प्रतिसाद पाहता शहजादाची रिलीज डेट एक आठवड्याने पुढे ढकलण्यात आली. आज सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

Web Title: Shahzada Karthik Aaryan returned the fees taken for film shehzada reveals reason behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.