रिट्विट करण्यात शाहरुखचा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 11:06 IST2016-01-16T01:10:27+5:302016-02-10T11:06:23+5:30

शाहरुखला ट्विटरवर १६.५ दशलक्ष लोक फॉलो करत असल्याचे २0१५ च्या रिपोर्टमध्ये समोर आले आहे. त्याचप्रमाणे चाहत्यांच्या ट्विटला उत्तर देणार्‍या ...

Shahrukh's record to be retweeted | रिट्विट करण्यात शाहरुखचा विक्रम

रिट्विट करण्यात शाहरुखचा विक्रम

हरुखला ट्विटरवर १६.५ दशलक्ष लोक फॉलो करत असल्याचे २0१५ च्या रिपोर्टमध्ये समोर आले आहे. त्याचप्रमाणे चाहत्यांच्या ट्विटला उत्तर देणार्‍या भारतीयांमध्ये शाहरुखने रेकॉर्ड केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेता शाहरुख खान अधिक लोकप्रिय असल्याचे समोर आले आहे. नरेंद्र मोदी यांना १६.४ दशलक्ष लोक फॉलो करतात तर अमिताभ बच्चन यांना १८.१ दशलक्ष लोक ट्विटवर फॉलो करीत असून शाहरुखने झईन मलिकसोबत काढलेल्या सेल्फीवर १ लाख ४१ हजार प्रतिक्रिया आल्या असून, १८.३ दशलक्ष लोकांना जगभरातून पाहिले आहे. या वर्षी नरेंद्र मोदींना ४ दशलक्ष लोक फॉलो करीत होते. ते चौपट झाले असून, मेपर्यंत ते १६ दशलक्ष झाले होते. आता मोदींनी टॉप टेनमध्ये स्थान पटकावले आहे. मोदींनी लेक वाचवा अभियानासाठी काढलेली सेल्फी लोकप्रिय झाली आहे, असेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Web Title: Shahrukh's record to be retweeted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.