शाहरूख अबरामसाठी बनला स्पाईडरमॅन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 19:27 IST2016-09-11T13:38:16+5:302016-09-11T19:27:17+5:30
शाहरूखने अबराम व त्याचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तो व अबराम स्पाईडरमॅनच्या गेटअपमध्ये दिसत आहे.
.jpg)
शाहरूख अबरामसाठी बनला स्पाईडरमॅन!
श हरूख खान एक चांगला अभिनेता तर आहेच. पण एक चांगला पिताही आहे. ही गोष्ट त्याने अनेकदा सिद्ध केली. तिन्ही मुलांवर शाहरूखचे मनापासून प्रेम आहे. पण लहानग्या अबरामबद्दल शाहरूख जरा जास्तच पजेसिव्ह आहे. शाहरूखने अबराम व त्याचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तो व अबराम स्पाईडरमॅनच्या गेटअपमध्ये दिसत आहे. शाहरूखने लाल रंगाचा तर अबरामने काळ्या रंगाचा स्पाईडरमॅन मास्क घातलेला आहे. We cannot accomplish all that we need to do without working together' ? असे कॅप्शन त्याने दिलेय. तेव्हा तुम्हीही बघा तर लाडक्या अबरामसोबत शाहरूखची मस्ती...