शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे; आता होणार या दिवशी प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 12:59 PM2023-03-15T12:59:27+5:302023-03-15T13:00:20+5:30

Shahrukh Khan's 'Jawan' :'जवान' हा शाहरुख खानचा या वर्षातला दुसरा बिग बजेट चित्रपट आहे. साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एटली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

Shahrukh Khan's 'Jawan' release date pushed forward; Now to be released on this day | शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे; आता होणार या दिवशी प्रदर्शित

शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे; आता होणार या दिवशी प्रदर्शित

googlenewsNext

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) चित्रपटातून तब्बल चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. देशासह परदेशातही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. २५ जानेवारी २०२३ ला रिलीज झालेल्या या चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे. दरम्यान चाहते त्याच्या आगामी 'जवान' (Jawan) या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असल्याचे म्हटले जात आहे. 

'जवान' हा शाहरुख खानचा या वर्षातला दुसरा बिग बजेट चित्रपट आहे. साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एटली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'जवान'चे निर्माते आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा विचार करत आहेत. अद्याप या वृत्ताला शाहरुख खान किंवा एटलीने कोणताही दुजोरा दिलेला नाही.
चित्रपट विश्लेषक रमेश बाला यांनी ट्वीट करत 'जवान'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यांनी ट्वीट केले की, एटली दिग्दर्शित शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट आता जूनमध्ये रिलीज होणार होता. तर आता हा चित्रपट ऑक्टोबर २०२३मध्ये रिलीज होणार आहे.

जवान चित्रपटात शाहरुख खान अॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला २०२२ मध्ये सुरुवात झाली. यात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये या चित्रपटाचे शूटिंग पार पडले. या चित्रपटात शाहरुखसोबत विजय सेतुपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा आणि सुनील ग्रोवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 

Web Title: Shahrukh Khan's 'Jawan' release date pushed forward; Now to be released on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.