शाहरुख खानला सुरू करायचेय हॉटेल! ‘सेक्सी’ ऐप्रन घालण्याचीही इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 11:32 IST2017-02-13T06:00:43+5:302017-02-13T11:32:02+5:30

शाहरुख खानने सगळे मिळवले आहे. पैसा-प्रसिद्धीची सर्व शिखरे त्याने पार केलेली आहेत. मग अशा सुपर सक्सेसफुल माणसाला आणखी कशाची ...

Shahrukh Khan wants to start the hotel! The desire to wear 'sexy' aprons | शाहरुख खानला सुरू करायचेय हॉटेल! ‘सेक्सी’ ऐप्रन घालण्याचीही इच्छा

शाहरुख खानला सुरू करायचेय हॉटेल! ‘सेक्सी’ ऐप्रन घालण्याचीही इच्छा

हरुख खानने सगळे मिळवले आहे. पैसा-प्रसिद्धीची सर्व शिखरे त्याने पार केलेली आहेत. मग अशा सुपर सक्सेसफुल माणसाला आणखी कशाची इच्छा असेल? अशी कोणती नवीन गोष्ट आहे जी त्याला मिळवायची आहे? शाहरुखला जर तुम्ही असे विचारले तर एक फार गंमतीशीर पण बुचक ळ्यात टाकणारे उत्तर देतो.

त्याचे उत्तर काय?

‘रोमान्सचा बादशाह’ शाहरुखला इटालियन रेस्टॉरंट सुरू करायचे आहे. अहो खरंच! तो म्हणतो, ‘अनेकांना माहित नाही की माझे वडील हॉस्पॅटिलिटी इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होते. त्यामुळे मला स्वत:ची हॉटेल सुरू करण्याची खूप इच्छा आहे. त्या रेस्टॉरंटमध्ये इटालियन खाद्यपदार्थ मिळतील. मला स्वत:ला बनवून दुसऱ्यांना खाऊ घालायला खूप आवडते.’

ALSO READ: OMG! शाहरुख खान -आमिर खानचा २५ वर्षांतील पहिलाच सेल्फी!

आता ‘एसआरके’ स्वत: बनवून खाऊ घालणार म्हटल्यावर तर चाहत्यांच्या तोंडाला पाणी सुटले असेल. मागच्या वर्षी तो तीन महिने युरोपमध्ये होता. त्यावेळी त्याने इटालियन जेवण कसे बनवतात हे शिकून घेतले आणि तो त्या जेवण्याच्या प्रेमातच पडला. मुंबईच्या जुहू भागात आपणही इटालियन रेस्टॉरंट काढण्याची कल्पना मग त्याच्या डोक्यात चमकून गेली.

तो सांगतो, ‘माझे वडील खूप छान जेवण बनवायचे. आता मला कामाच्या व्यापामुळे तेवढा वेळ मिळत नाही; पण जमेल तसे वेळ काढून मी घरी जेवण बनवण्याचा प्रयत्न करीत असतो. माझ्या मुलांना माझ्या हातचे जेवण खाऊ घालण्याची माझी मनोमन इच्छा आहे. त्यांच्याशी जोडले जाण्यासाठी मला हा पर्याय सर्वोत्तम वाटतो. आणि स्वयंपाक करताना घालावे लागणाऱ्या ऐप्रनमध्ये मी फार सेक्सी दिसेल यात काही शंका नाही.’

बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांचे रेस्टॉरंट्स आहेत. शिल्पा शेट्टी, सुनिल शेट्टी, गोविंदानेही ‘हीरो नं. १’ नावाने हॉटेल सुरू केले. त्यामुळे शाहरु खनेही एखादे हॉटेल सुरू केले तर आश्चर्य वाटू नये. मग तुम्हाला शाहरुखच्या हॉटेलमध्ये काय खायला आवडेल हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा...

ALSO READ: ​शाहरुख खानला का आवडते पँट काढायला?

Web Title: Shahrukh Khan wants to start the hotel! The desire to wear 'sexy' aprons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.