'जवान' चा दिग्दर्शक अॅटली कुमारच्या आईची शाहरुखने घेतली भेट; स्टेजवरच नमस्कार करत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 15:31 IST2023-09-04T15:30:02+5:302023-09-04T15:31:57+5:30
चेन्नईमध्ये जवानचा प्री रिलीज इव्हेंट आयोजित करण्यात आला होता.

'जवान' चा दिग्दर्शक अॅटली कुमारच्या आईची शाहरुखने घेतली भेट; स्टेजवरच नमस्कार करत...
शाहरुख खान (Shahrukh Khan) असा अभिनेता आहे ज्याचे चाहते जगभरात आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी लोक आतुर असतात. सध्या किंग खान आगामी 'जवान' (Jawan) सिनेमामुळे चर्चेत आहे. साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली कुमारने (Atlee Kumar) जवानचे दिग्दर्शन केले आहे. सध्या सिनेमाची प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. नुकतंच सिनेमाच्या म्युझिक लाँचचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जवानची संपूर्ण टीम उपस्थित होती. दरम्यान अॅटली कुमारने आपल्या आईची किंग खानशी भेट घडवून दिली.
चेन्नईमध्ये जवानचा प्री रिलीज इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. यासाठी चित्रपटातील सर्वच कलाकार मंडळी उपस्थित होती. जवानचा म्युझिक लाँचही याचवेळी पार पडला. इव्हेंटमध्ये दिग्दर्शक अॅटली कुमार संपूर्ण कुटुंबासह आला होता. अॅटली आपल्या आईला मंचावर घेऊन गेला तेव्हा शाहरुख खानने हात जोडून त्यांचं स्वागत केलं. नंतर त्यांना मिठीही मारली. शाहरुखला भेटून अॅटलीच्या आईचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Shah Rukh Khan with Atlee Anna's mother 🥹❤️#ShahRukhKhanpic.twitter.com/mNB3Ey77bO
— srkvibe 🇮🇳 (Renu) - Fan account (@srkvibe) September 3, 2023
शाहरुख खानचा विनम्रपणा पाहून त्याने पुन्हा एकदा चाहत्यांचं मन जिंकलं आहे. ७ सप्टेंबर रोजी 'जवान' जगभरात प्रदर्शित होत आहे. सिनेमाचं प्री बुकिंग जोरात सुरु आहे. 'जवान'मध्ये साऊथ कलाकारांची तर मांदियाळी आहे. नयनतारा आणि शाहरुखचा रोमान्स सिनेमात पाहायला मिळणार आहे.