Shahrukh Khan: कोण म्हणेल ‘पठान’ 56 वर्षांचा आहे! शाहरूख खानचा शर्टलेस फोटो पाहून क्रेझी झालेत फॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 05:58 PM2022-09-25T17:58:55+5:302022-09-25T18:11:52+5:30

Shahrukh Khan Look Viral From Pathaan : ‘पठान’साठी शाहरूखने किती घाम गाळला, ते या फोटोवरून स्पष्ट दिसतंय. शाहरूख 56 वर्षांचा आहे, यावर हा फोटो पाहून क्षणभर विश्वास बसत नाही...

Shahrukh Khan Look Viral From Pathaan Looks Stunning In 8 Pack Abs | Shahrukh Khan: कोण म्हणेल ‘पठान’ 56 वर्षांचा आहे! शाहरूख खानचा शर्टलेस फोटो पाहून क्रेझी झालेत फॅन्स

Shahrukh Khan: कोण म्हणेल ‘पठान’ 56 वर्षांचा आहे! शाहरूख खानचा शर्टलेस फोटो पाहून क्रेझी झालेत फॅन्स

googlenewsNext

Shahrukh Khan Look Viral From Pathaan : ‘किंगखान’ शाहरूख खानच्या (Shahrukh Khan ) ‘पठान’ (Pathaan) या सिनेमाकडे चाहते डोळे लावून बसले आहेत. सर्वप्रथम या सिनेमाचा जबरदस्त अनाउंसमेंट व्हिडीओ आला. यानंतर ‘पठान’चा फर्स्ट लुक रिव्हील करण्यात आला आणि आता या चित्रपटातील एसआरकेचा आणखी एक शर्टलेस फोटो समोर आला आहे. शाहरूखचा हा फोटो पाहून चाहते क्रेझी झाले आहेत.
होय, खुद्द शाहरूखने हा फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यात तो 8 पॅक एब्ज फ्लॉन्ट करताना दिसतोय. ‘पठान’साठी शाहरूखने किती घाम गाळला, ते या फोटोवरून स्पष्ट दिसतंय. शाहरूख 56 वर्षांचा आहे, यावर हा फोटो पाहून क्षणभर विश्वास बसत नाही...

मजेशीर कॅप्शन

हा फोटो शेअर करताना शाहरूखने आपल्या शर्टासाठी एक खास मॅसेज लिहिला आहे. 
मी टू माय शर्ट : तुम होती तो कैसा होता...
तुम इस बात पर हैरान होतीं,
तुम इस बात पर कितना हंसती...
तुम होतीं तो ऐसा होता...
मी सुद्धा ‘पठान’ची प्रतीक्षा करतोय...., असं कॅप्शन शाहरूखने या फोटोला दिलं आहे.

‘पठान’ या चित्रपटात शाहरूख आणि दीपिका पादुकोण ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. जॉन अब्राहमचीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा सिनेमा पुढील वर्षी 25 जानेवारीला रिलीज होतोय. याशिवाय येत्या काळात शाहरूखचे आणखी दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. जवान आणि डंकी या चित्रपटातही तो दिसणार आहे. साहजिकच शाहरूखचे फॅन्स सुपर एक्साइटेड आहेत.

2018 मध्ये शाहरूखचा ‘झिरो’ हा सिनेमा रिलीज झाला होता. यानंतर शाहरूख  एकही सिनेमा रिलीज झाला नाही. ब्रह्मास्त्र व रॉकेट्री या चित्रपटात तो कॅमिओ करताना दिसला तितकाच. पण 2023 मध्ये शाहरूख दमदार कमबॅक करतोय. ‘पठान’मध्ये शाहरूख जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. यानंतर ‘जवान’ या चित्रपटातही त्याचा सॉलिड अ‍ॅक्शन फॉर्म पाहायला मिळणार आहे. राजकुमार हिरानीच्या ‘डंकी’मध्ये तो एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Web Title: Shahrukh Khan Look Viral From Pathaan Looks Stunning In 8 Pack Abs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.