शाहरुख खानने दिलेली IIT ची परीक्षा, पासही झाला पण..., बॉलिवूडच्या 'किंग'ने सांगितलेला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 15:41 IST2025-09-08T15:39:46+5:302025-09-08T15:41:10+5:30
शाहरुख खानने करुन दाखवलं पण...

शाहरुख खानने दिलेली IIT ची परीक्षा, पासही झाला पण..., बॉलिवूडच्या 'किंग'ने सांगितलेला किस्सा
शाहरुख खान (Shahrukh Khan) आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडचा 'किंग' बनला. शाहरुख खान जे ठरवतो ते करुनच दाखवतो. अभिनयातलं यश असो किंवा मुंबईत मन्नत बंगला खरेदी करणं असो त्याने जे जे ठरवलं ते ते कमावलं. शाहरुख शैक्षणिक जीवनातही हुशार होता. इतकंच काय तर त्याने आयआयटीची एन्ट्रन्स परीक्षाही दिली होती आणि तो पासही झाला होता. मात्र त्याने अॅडमिशन घेतली नाही. याचं कारणही त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
२००० साली बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खान म्हणाला, "जेव्हा मी करिअर काय करायचं याचा विचार करत होतो तेव्हा माझी आई म्हणालेली की तू विज्ञान घे. पण मला अर्थशास्त्र घ्यायचं होतं. कारण शाळेत विज्ञान शिकलो होतो. पण आईने मला आयआयटीची परीक्षा द्यायला सांगितली. तिने मला 'तू इंजिनिअरिंगची परीक्षा देऊ शकतो का असं विचारलं. मी म्हणाले,'देतो'. ती म्हणाली, 'ठीक आहे मला फक्त करु दाखव'. मी परीक्षा दिली आणि पास झालो. मग ती म्हणाली, 'आता तू अर्थशास्त्र करु शकतोस'.
याच मुलाखतीत शाहरुख परत म्हणालेला की, "आमचं कुटुंब उदारमतवादी होतं. आपल्या मर्जीने धर्माचं पालन करायला आम्हाला प्रोत्साहन दिलं. मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला कधीच काय कर काय नको करु असं सांगण्यात आलं नाही. "
शाहरुख खान आगामी 'किंग' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये त्याची लेक सुहानाही आहे. सध्या सिनेमाचं शूट पोलंडमध्ये सुरु आहे. सिनेमाच्या सेटवरच शाहरुखला दुखावत झाली होती. त्याच्या हाताला पट्टी बांधली आहे. मात्र आता त्याने पुन्हा शूट सुरु केलं आहे.