शाहरुख खान 'डंकी' मध्ये 'या' भूमिकेत दिसणार, नव्या पोस्टरमधून रिलीज डेटही आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 09:08 AM2023-10-22T09:08:23+5:302023-10-22T09:09:30+5:30

'डंकी' पोस्टपोन होणार अशा चर्चा सुरु असतानाच आता सिनेमा प्रिपोन झाल्याचं कळतंय.

shahrukh khan dunki movie international poster released he will be seen in soldier s role | शाहरुख खान 'डंकी' मध्ये 'या' भूमिकेत दिसणार, नव्या पोस्टरमधून रिलीज डेटही आली समोर

शाहरुख खान 'डंकी' मध्ये 'या' भूमिकेत दिसणार, नव्या पोस्टरमधून रिलीज डेटही आली समोर

Dunki Movie: शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) आगामी 'डंकी' (Dunki) सिनेमाटी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 'पठाण' आणि 'जवान' च्या ब्लॉकबस्टर यशानंतर शाहरुख आणखी एक सुपरहिट सिनेमा देत हॅट्रिक करतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. २०२३ हे वर्ष शाहरुखसाठी भलतंच खास ठरलंय यात शंका नाही. राजकुमार हिरानींच्या 'डंकी' सिनेमाचं नवं आंतरराष्ट्रीय पोस्टर नुकतंच रिलीज झालंय. या पोस्टरमधून सिनेमाची रिलीज डेट आणि किंग खानची भूमिकाही स्पष्ट कळून येत आहे.

'डंकी' पोस्टपोन होणार अशा चर्चा सुरु असतानाच आता सिनेमा प्रिपोन झाल्याचं कळतंय. परदेशात डंकी रिलीज करणाऱ्या डिस्ट्रिब्युटरने सिनेमाचं एक पोस्टर रिलीज केलं आहे. यामध्ये शाहरुखने पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि आर्मी प्रिंटचा कार्गो घातला आहे.त्याच्याकडे बरंच सामान आहे. हा शाहरुखचा पाठमोरा फोटो आहे. तर पोस्टरवर असंही लिहिलं आहे की,'सैनिकाचा वचनपूर्तीच्या दिशेने प्रवास'. म्हणजेच शाहरुख यामध्ये सैनिकाच्या भूमिकेत आहे आणि वचन पूर्ण करण्यासाठी त्याला जगभर फिरावं लागत आहे. याशिवाय पोस्टरमध्ये रिलीज डेट 21 डिसेंबर 2023 दिली आहे. म्हणजेच सिनेमा भारतात रिलीज होण्याच्या एक दिवस आधीच परदेशात रिलीज होणार आहे.

शाहरुख खान 'डंकी'ची रिलीज डेट पोस्टपोन करेल अशा चर्चा होत्या. कारण २१ डिसेंबरला प्रभासचा बहुप्रतिक्षित 'सालार' सिनेमा रिलीज होतोय. मात्र डंकी नियोजित वेळीच प्रदर्शित होणार आहे. सलमान खानच्या 'टायगर 3' वेळी डंकीचं टीझर दाखवण्यात येईल अशीही एक चर्चा आहे. कारण 'टायगर' आणि 'डंकी' दोन्ही यशराज फिल्म्सचे चित्रपट आहेत. 

'डंकी'मधून शाहरुखने पहिल्यांदाच राजकुमार हिरानींसोबत काम केलं आहे. सिनेमात तापसी पन्नू, बोमन ईरानी, दिया मिर्झाही मुख्य भूमिकेत आहेत. तर विकी कौशल कॅमियो रोलमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.

Web Title: shahrukh khan dunki movie international poster released he will be seen in soldier s role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.