विश्व आर्थिक मंचावर सन्मानित होणार शाहरुख खान !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 10:08 IST2018-01-12T04:38:49+5:302018-01-12T10:08:49+5:30
बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खानला दावोसमध्ये होणाऱ्या विश्व आर्थिक मंच्याच्या 48 व्या वार्षिक बैठकीत 24व्या वार्षिक क्रिस्टल अॅवॉर्डने सन्मानित करण्यात ...
.jpg)
विश्व आर्थिक मंचावर सन्मानित होणार शाहरुख खान !
ब लिवूडचा किंगखान शाहरुख खानला दावोसमध्ये होणाऱ्या विश्व आर्थिक मंच्याच्या 48 व्या वार्षिक बैठकीत 24व्या वार्षिक क्रिस्टल अॅवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. हा अॅवॉर्ड त्याला देशातील लहान मुलं आणि महिल्यांच्या हक्कांचे समर्थन करण्यासाठी देण्यात येणार आहे. विश्व आर्थिक मंचच्या वेबसाईटच्या अनुसार, अभिनेत्री निर्देशिका केट ब्लैंचेट आणि गायिता एल्टन जॉनला सुद्धा हा अॅवॉर्ड देऊन सम्मानित करण्यात येणार आहे. हा अॅवॉर्डने गौरविण्यात येणाऱ्या प्रत्येकांने आपल्या पातळीवर मानवता टिकून राहण्यासाठी प्रयत्न केला आहे.
शाहरुख खानची संस्था मीर फाऊंडेशन अॅसिड हल्ला पीडित महिलांसाठी काम करते. अॅसिड हल्ल्यातील पीडितांचे पुनर्वसन त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे काम करते. शाहरुख लहान मुलांसाठी हॉस्पिटलमध्ये स्पेशल वॉर्ड आणि कँसर पीडित मुलांच्या मेडिकलचा खर्च करतो.
गुरुवारी शाहरुखला हा अॅवॉर्ड जाहिर झाल्यावर त्यांने आभार व्यक्त केले. '' मी त्या धाडसी आणि सुंदर महिलांसोबत काम करणं माझे सौभाग्य समजतो. कारण त्यांनी जगण्याचा एक उद्देश दिला. माझ्या या कार्यात इतर लोकही लवकरच शामिल होतील अशी मी आशा करतो. '' 22 जानेवारीला हा अॅवॉर्ड सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
ALSO READ : शाहरुख खान सांगतोय, आजवर आयुष्याने मला शिकवले हे धडे
सध्या शाहरुख खान त्याला आगामी चित्रपट झिरोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात तो एका बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील शाहरूखची व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’या चित्रपटात अनेक व्हिज्युअल इफेक्ट्स दिसणार आहेत. शाहरूखची कंपनी रेड चिलीज् व्हीएफएक्सकडे हे काम आहे.शाहरूखच्या या चित्रपटासाठी विदेशातून एक्सपर्ट बोलवले गेलेत, असेही कळतेय. आनंद एल राय यांच्या या चित्रपटात शाहरूख खानसोबत अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ या दोघी मुख्य भूमिकेत आहेत. यंदा नाताळच्या मुहूर्तावर म्हणजेच २१ डिसेंबरला ‘झिरो’ प्रदर्शित होणार आहे.