यार, आता 'झीरो'ची आठवण काढू नका; चाहत्यानं शून्याचा हिशेब मांडला, शाहरुख मिष्किल हसला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 06:04 PM2023-09-27T18:04:25+5:302023-09-27T18:05:17+5:30

चाहत्याने शाहरुखला करुन दिली 'झिरो' ची आठवण

shahrukh khan ask srk on twitter a fan remind him of zero his reply won internet | यार, आता 'झीरो'ची आठवण काढू नका; चाहत्यानं शून्याचा हिशेब मांडला, शाहरुख मिष्किल हसला!

यार, आता 'झीरो'ची आठवण काढू नका; चाहत्यानं शून्याचा हिशेब मांडला, शाहरुख मिष्किल हसला!

googlenewsNext

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने (Shahrukh Khan) 'पठाण' आणि 'जवान' मधून जबरदस्त कमबॅक केलंय. चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर येत त्याने आपणच किंग असल्याचं दाखवून दिलंय. याआधी त्याचे 'रईस', 'फॅन' आणि 'झिरो' हे चित्रपट दणकून आपटले होते. नंतर आर्यन खानच्या प्रकरणामुळे तो चाहत्यांपासूनही दूर गेला होता. पण आता त्याने आपण झिरो नाही तर हिरो असल्याचं दाखवून दिलंय. तरी एका चाहत्याने त्याला 'झिरो' (Zero) वरुन गंमतीत डिवचलं. आता चाहत्याच्या या गंमतीला शाहरुखने नेमकं कसं घेतलं बघा.

नुकतंच शाहरुख खाननेट्विटरवर 'आस्क एसआरके' हे सेशन घेतलं. यामध्ये तो चाहत्यांच्या ट्विट्सवर दिलखुलास उत्तरं देतो. एका चाहत्याने ट्वीट केलं,'सर, १००० कोटीमध्ये १० झिरो असतात. जवानचं बॉक्सऑफिस कलेक्शन ऐकल्यानंतर मला लक्षात आलं. तुम्हालाही कळलं का?'

यावर शाहरुख म्हणाला,'अरे यार, आता झिरो झिरो ची नको आठवण करुन देऊ...हो हो.'

शाहरुख खान नेहमीच आपल्या ऑन द स्पॉट उत्तरानं चाहत्यांचं मन जिंकतो. त्याचा हजरजबाबीपणा लोकांना भलताच आवडतो. सध्या शाहरुख 'जवान'चं यश एन्जॉय करतोय. तर लवकरच त्याचा 'डंकी' सिनेमा रिलीज होतोय. एकाच वर्षात शाहरुख खान तीन तीन ब्लॉकबस्टर हिट देण्याच्या तयारित आहे. किंग इज बॅक!

Web Title: shahrukh khan ask srk on twitter a fan remind him of zero his reply won internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.