'डंकी'च्या शूटिंगसाठी काश्मीरमध्ये पोहोचला किंग खान, पुष्पगुच्छांनी झालं स्वागत; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 14:16 IST2023-04-25T14:15:24+5:302023-04-25T14:16:23+5:30
शाहरुख खान मॅनेजर पूजा ददलानीने सोशल मीडियावर काश्मीरच्या सुंदर नजाऱ्याचा फोटो पोस्ट केला आहे.

'डंकी'च्या शूटिंगसाठी काश्मीरमध्ये पोहोचला किंग खान, पुष्पगुच्छांनी झालं स्वागत; Video व्हायरल
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) 2023 च्या सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. आधी पठाण सिनेमाची रेकॉर्डब्रेक कमाई आणि आता आगामी सिनेमाच्या शूट मध्ये तो व्यस्त आहे. चार वर्षांनंतर किंग खान पुन्हा अॅक्टिव्ह झाला आहे. शाहरुख आगामी 'डंकी' (Dunki) आणि 'जवान' (Jawan) या सिनेमांमध्ये दिसणार आहे. 'डंकी'च्या शूटसाठी शाहरुख काश्मीरला पोहोचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
शाहरुख खान मॅनेजर पूजा ददलानीने सोशल मीडियावर काश्मीरच्या सुंदर नजाऱ्याचा फोटो पोस्ट केला आहे. यावरुन चाहत्यांनी अंदाजा लावला की शाहरुख आणि त्याची टीम काश्मीरमध्ये आहेत. तर काहीच वेळात एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये शाहरुख वेगळ्याच लुकमध्ये दिसत आहे. या व्हिडिओत शाहरुख पूजाज ददलानी आणि टीमसोबत चालताना दिसत आहे. फुलांचा गुच्छ देत किंग खानचं स्वागत झाल्याचंही व्हिडिओत दिसून येत आहे.
#ShahRukhKhan spotted entering hotel in Sonamarg ♥️🔥#dunki#Kashmirpic.twitter.com/CPCfYPQ5HE
— Shahrukh Girlfriend (@Neeta11shahrukh) April 25, 2023
शाहरुख आपल्या टीमसह सोनमर्ग येथील एका हॉटेलमध्ये राहत आहे. हॉटेलमध्ये जात असतानाचाच त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. 'डंकी' या चित्रपटातून शाहरुख पहिल्यांदाच राजकुमार हिरानी यांच्याबरोबर काम करत आहे. सिनेमात तापसी पन्नू, विक्की कौशल, बोमन ईरानी आणि सतीश शाह यांचीही मुख्य भूमिका आहे.