शाहरूख खान पुन्हा होणार ‘फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड्स’चा होस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:45 IST2016-12-20T18:26:49+5:302016-12-21T16:45:59+5:30

तुम्ही शाहरूख खानचे फॅन आहात का? तर मग तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. शाहरूख खान यंदाही ‘फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड्स’चा होस्ट असणार ...

Shahrukh Khan again to host Filmfare Awards | शाहरूख खान पुन्हा होणार ‘फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड्स’चा होस्ट!

शाहरूख खान पुन्हा होणार ‘फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड्स’चा होस्ट!

म्ही शाहरूख खानचे फॅन आहात का? तर मग तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. शाहरूख खान यंदाही ‘फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड्स’चा होस्ट असणार आहे. अ‍ॅवॉर्ड फंक्शन आणि शाहरूख खानचे ‘होस्टिंग’ हे जणू समीकरणच बनले आहे. म्हणून  पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या बादशाहला स्टेजवर पाहण्याची जादू अनुभवायला मिळणार आहे. तो आत्तापर्यंत अनेकदा फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड्सचा होस्ट बनला आहे. सैफ अली खान, रणबीर कपूर आणि कपिल शर्मा हे त्याचे को-होस्ट असल्याचे आपण पाहिले. नुकताच तो यंदाच्या ‘स्क्रीन अ‍ॅवॉर्ड्स’ मध्ये सलमान खानसोबत होस्ट झाला होता. 



शॉर्ट फिल्म्सला प्रोत्साहन देण्यासाठी फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डसने यंदा पाच नव्या कॅटेगरी समाविष्ट करून घेतल्या आहेत. शॉर्ट फिल्म्स या कॅटेगरीमध्ये परीक्षक म्हणून विद्या बालन, करण जोहर, झोया अख्तर, कबीर खान, गौरी शिंदे आणि मेघना गुलजार हे दिसतील. विद्या म्हणते,‘ मी आत्तापर्यंत जागतिक पातळीवर अनेक फिल्म फेस्टीव्हलमध्ये परीक्षक झाले आहे. पण, यावेळी फिल्मफेअरचा फॉरमॅट काही वेगळा आणि निवडक आहे.‘ त्यावर गौरी शिंदे म्हणाली,‘ शॉर्ट फिल्ममधील कथानक हे खरंच जर उत्तम असेल तर त्या कथानकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिग्दर्शकांसाठी हे उत्तम व्यासपीठ आहे.‘ त्यानंतर झोया अख्तर म्हणाली,‘ या शॉर्ट फिल्मचे कथानक हे जागतिक पातळीवरील असून, यातून विजेता निवडणे अत्यंत कठीण आहे.’ 

फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड्सच्या निमित्ताने शाहरूख खान त्याच्या फॅन्सला नववर्षाचे गिफ्टच देऊ इच्छित आहे, असे दिसतेय. सध्या शाहरूख राहुल ढोलकिया दिग्दर्शित ‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्या चित्रपटातील भूमिकेमुळे चित्रपटाला वादग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. 

Web Title: Shahrukh Khan again to host Filmfare Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.