दीपिका सोबत रोमान्स करण्यास शाहरुख उत्सुक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 13:37 IST2016-07-23T08:07:02+5:302016-07-23T13:37:02+5:30
‘पद्मावती’ चित्रपटात दीपिका पादुकोण राणी पद्मावतीची भूमिका करणार असून तिचा नवरा राजा रावल रतन सिंगची भूमिका शाहरुख करणार असल्याचे ...

दीपिका सोबत रोमान्स करण्यास शाहरुख उत्सुक?
शाहरुख आणि संजय लीला भन्साळी यांचे 'देवदास' चित्रपटामुळे चांगले संबंध आहेत. त्यामुळे ही भूमिका त्याला मिळू शकेल असे चंदेरी दुनियेत सांगितले जाते.
यापूर्वी राजा रावल रतन सिंगच्या भूमिकेसाठी विकी कौशल, शाहिद कपूर यांचा विचार सुरू होता.
रणवीर आणि दीपिका यात मुख्य भूमिकेत असले तरी पडद्यावर त्यांचा रोमान्स दिसणार नाही. कारण या दोघांचा एकही सीन एकत्र असणार नसल्याचे समजते.
दीपिका या चित्रपटात रोमान्स आपल्या पतीसोबत करेल. त्यामुळे दीपिकासोबत रोमान्स करण्याची संधी रणवीरला नाही तर नव्या घडामोडीनुसार शाहरुखला मिळू शकेल. रणवीर यात अल्लाऊद्दीन खिलजीची भूमिका करणार आहे.