शहनाज गिलने सलमान खानच्या फार्महाउसवरील पार्टीबाबत केला खुलासा, म्हणाली - "तिथे एका वेगळ्या प्रकारचा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 10:32 IST2025-11-12T10:32:00+5:302025-11-12T10:32:32+5:30
Salman Khan And Shehnaaz Gill : सलमान खान त्याच्या फार्महाऊसवर होणाऱ्या पार्टीमुळे सगळीकडे चर्चेत येत असतो. नुकत्याच एका मुलाखती शहनाज गिलने फार्महाऊसवर होणाऱ्या पार्टीबाबत खुलासा केला आहे.

शहनाज गिलने सलमान खानच्या फार्महाउसवरील पार्टीबाबत केला खुलासा, म्हणाली - "तिथे एका वेगळ्या प्रकारचा..."
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान अनेकदा त्याच्या पनवेलमधील फार्महाऊसवर पार्टी करत असतो. त्याच्या पनवेल फार्महाऊसची पार्टी खूप प्रसिद्ध आहे. त्याच्या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ वारंवार सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सलमानच्या फार्महाऊसवर पार्टीत काय काय होते आणि ही पार्टी इतकी प्रसिद्ध का असते, असा विचार चाहते नेहमी करत असतात. अलीकडेच अभिनेत्री शहनाज गिलने सलमानच्या फार्महाऊसवर होणाऱ्या पार्टीजमध्ये नक्की काय होते, याचा खुलासा केला आहे.
शहनाज गिल सध्या तिच्या 'इक कुड़ी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तिच्या चित्रपटाला खूप पसंती मिळत आहे. याच दरम्यान शहनाजने रणवीर अल्लाहबादियाला दिलेल्या पॉडकास्टमध्ये सलमान खानच्या फार्महाऊसवर होणाऱ्या पार्टीबद्दल सांगितले. शहनाजने सलमानसोबत 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात काम देखील केले आहे.
फार्महाउसवरील पार्टीबद्दल शहनाज म्हणाली...
शहनाजने सांगितले की, 'किसी का भाई किसी की जान'च्या शूटिंगदरम्यान तिला सलमान खानच्या फार्महाऊसवर १-२ दिवस थांबण्याची संधी मिळाली. तिथे तिला खूप मजा आली होती. तिने सांगितले की, फार्महाऊसवरील पार्टीचा अर्थ महागडी दारू आणि डान्स असा नसतो. तो एका वेगळ्या प्रकारचा 'देसी' आनंद असतो. पार्टीत सगळे लोक एटीव्हीवर इकडे-तिकडे चकरा मारत असतात. सलमान सर देखील बोर किंवा जांभूळ यांसारखी फळे तोडत असतात. सलमान खान खूप देसी आहेत आणि पूर्ण 'देसी' काम करतात, जसे शेतकरी करतात.
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, तो सध्या 'बिग बॉस १९' होस्ट करताना दिसत आहे. या व्यतिरिक्त तो सध्या त्याचा आगामी 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटावर काम करत आहे. तो चित्रपटाचं शूटिंग देखील करत आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी सिनेमागृहात प्रदर्शित होईल. चित्रपटातून सलमानचा लूकही समोर आला आहे.