शाहिदचा ‘सिक्स पॅक अ‍ॅब्स‘ सेल्फी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 15:01 IST2016-12-15T15:01:28+5:302016-12-15T15:01:28+5:30

शाहिद कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतो. तुम्ही त्याच्या इन्स्टाग्राम, ट्विटर अकाऊंटवर गेलात तर कधीही नाराज होणार नाही. त्याचे ...

Shahid's 'Six Pack Abs' Selfie! | शाहिदचा ‘सिक्स पॅक अ‍ॅब्स‘ सेल्फी!

शाहिदचा ‘सिक्स पॅक अ‍ॅब्स‘ सेल्फी!

हिद कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतो. तुम्ही त्याच्या इन्स्टाग्राम, ट्विटर अकाऊंटवर गेलात तर कधीही नाराज होणार नाही. त्याचे लेटेस्ट फोटो, व्हिडिओ त्यावर अपडेट असतात. सध्या तो त्याचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’ मुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणापासून त्याने सेटवरील फोटो सोशल मीडियावर खास चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. नुकताच त्याने एक ‘सिक्स पॅक अ‍ॅब्स’ सेल्फी शेअर केलाय. यात तो अतिशय हॉट दिसतो आहे. त्याच्या या फोटोवरून कळतेय की, त्याने ‘पद्मावती’ साठी किती मेहनत घेतली आहे. ‘लेट नाईट्स आॅर अर्ली मॉर्निंग्ज स्लीपलेस...’ या कॅप्शनसह हा फोटो खास करून त्याच्या चाहतींसाठी आहे. 

शाहिद कपूरच्या भूमिकांचे एक विशेष असते, त्याला जी भूमिका मिळते ती तो मेहनत घेऊन साकारतो. ‘पद्मावती’ मध्ये राजा रावळ रतन सिंगची भूमिका तो साकारतो आहे. राजाच्या भूमिकेसाठी त्याने दिवसरात्र मेहनत घेतली आहे, हे या सेल्फीवरून कळतेच आहे. मध्यंतरी, दीपिका पादुकोणसोबत इंटीमेट सीन करण्यासाठी त्याने नकार दिला होता. त्यामुळे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी हा सीन चित्रपटातून वगळला आहे. 

शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत ही जोडी ‘बी टाऊन’ च्या हॉट जोड्यांपैकी एक आहे. ते दोघे नुकतेच ‘कॉफी विथ करण’ च्या शोवर आले होते. दिल्लीची मुलगी मीराने अनेक घटना, गोष्टी शोवर करणसोबत शेअर केल्या आहेत. या शोच्या निमित्ताने ती छोट्या पडद्यावर तरी आली. 

                                                         

Web Title: Shahid's 'Six Pack Abs' Selfie!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.