शाहीदचा नवा लूक कशासाठी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 22:32 IST2016-09-24T16:44:22+5:302016-09-24T22:32:14+5:30
भूमिका कुठलीही असो, त्यात जीव ओतण्यासाठी शाहीद कपूर जीवाचे रान करतो. आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचाच त्याचा प्रयत्न असतो. ...

शाहीदचा नवा लूक कशासाठी?
भ मिका कुठलीही असो, त्यात जीव ओतण्यासाठी शाहीद कपूर जीवाचे रान करतो. आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचाच त्याचा प्रयत्न असतो. मग त्यासाठी स्वत:चे लूक बदलण्यापासून सगळे काही तो करतो. सध्या शाहीद एका आगळ्यावेगळ्या लूकमध्ये दिसतो आहे. हा नवा लूक म्हणजे किंचित वाढलेली दाढी आणि पिळदार मिशा. आता शाहीदचा हा लूक संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’साठी असल्याचे मानले जात आहे. त्यातच २३ सप्टेंबरच्या रात्री शाहीद भन्साळींच्या आॅफिसमधून बाहेर पडताना दिसला. त्यावरून तरी शाहीदने ‘पद्मावती’ची तयारी सुरु केल्याचे दिसतेय. आता प्रतीक्षा आहे ती केवळ त्याच्या अधिकृत घोषणेची.
![]()