Beyond The Cloudsमध्ये असा दिसणार शाहिदचा भाऊ इशान खट्टर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 16:02 IST2017-02-10T10:32:02+5:302017-02-10T16:02:52+5:30

भाऊ शाहिद कपूर याच्या पावलावर पाऊल टाकत, इशान खट्टर बॉलिवूडमध्ये आला. इराणचे सुप्रसिद्ध फिल्ममेकर माजिद मजीदी यांच्या Beyond The Clouds या चित्रपटातून इशान बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज जारी झाले.

Shahid's brother Ishaan Khattar looks like this in Beyond The Clouds! | Beyond The Cloudsमध्ये असा दिसणार शाहिदचा भाऊ इशान खट्टर!

Beyond The Cloudsमध्ये असा दिसणार शाहिदचा भाऊ इशान खट्टर!

ऊ शाहिद कपूर याच्या पावलावर पाऊल टाकत, इशान खट्टर बॉलिवूडमध्ये आला. इराणचे सुप्रसिद्ध फिल्ममेकर माजिद मजीदी यांच्या Beyond The Clouds या चित्रपटातून इशान बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज जारी झाले.
बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये हे पहिले पोस्टर रिलीज केले गेले. यात इशान  सूर्यमावळीच्या वेळी पक्ष्यांच्या सोबतीने एका नदीकाठी उभा असलेला दिसतो आहे. इशानसाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. पहिल्याच चित्रपटात इशानला आॅस्कर नॉमिनेटेड डायरेक्टर माजिद मजीदी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. ‘साँग आॅफ स्पॅरोज’,‘बारन’,‘दी कलर आॅफ पॅराडाईज’ आणि ‘चिल्ड्रेन आॅफ हेविन’ अशा जगप्रसिद्ध चित्रपटांसाठी मजीदी ओळखले जातात. मजीदी इशानचा अभिनय पाहून बरेच प्रभावित झाल्याचे कळतेय.
 


इशान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी ब-याच दिवसांपासून चर्चा होती. सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिच्यासोबत इशान दिसणार अशीही बातमी होती. मात्र ही बातमी अफवा निघाली. इशाने आपल्या बॉलिवूड डेब्यूसाठी Beyond The Cloudsची निवड केली.
लहान भावाच्या करिअरची सुरुवात झाली, हे पाहून शाहिदही जाम खूश आहे . याच आनंदात तो इशानला प्रमोट करतो आहे. इशानच्या चित्रपटाचे पोस्टर शेअर करीत शाहिदने त्याला बेस्ट लक विश केले आहे.

ALSO READ : And…ACTION: ​शाहिद कपूरचा भाऊ इशान बनला हिरो; शूटींग सुरु!
शाहिद कपूरचा भाऊ करणार का दीपिका पदुकोणसोबत डेब्यू?

मजीदींच्या या चित्रपटासाठी दीपिका पादुकोण हिने सुद्धा तिच्या डी-ग्लॅम अवतारात लूक टेस्ट दिली होती. त्यामध्ये ती मुंबईच्या धोबी घाटावर झोपडपट्टीत राहणाºया मुलीच्या रुपात दिसली होती.अर्थात अद्याप तिचे नाव फायनल झालेले नाही. हिंदी आणि इंग्रजी भाषेत हा चित्रपट तयार केला जाणार असून नंतर तो फारसी भाषेत डब केला जाणार आहे.

Web Title: Shahid's brother Ishaan Khattar looks like this in Beyond The Clouds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.