शाहिद कपूरच्या प्री-बर्थडे पार्टीत ३०० रुपयांचा टॉप घालून पोहचली दीपिका पादुकोन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 21:33 IST2017-02-22T16:03:30+5:302017-02-22T21:33:30+5:30

अभिनेता शाहिद कपूर याने नुकतेच त्याच्या प्री-बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. ...

Shahid Kapoor's pre-birthdays party topped 300 rupees in the top Deepika Padukone! | शाहिद कपूरच्या प्री-बर्थडे पार्टीत ३०० रुपयांचा टॉप घालून पोहचली दीपिका पादुकोन!

शाहिद कपूरच्या प्री-बर्थडे पार्टीत ३०० रुपयांचा टॉप घालून पोहचली दीपिका पादुकोन!

िनेता शाहिद कपूर याने नुकतेच त्याच्या प्री-बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. हल्ली भारतापेक्षा विदेशात राहणारी अभिनेत्री दीपिका पादुकोनही या पार्टीत आवर्जून उपस्थित होती. काळ्या रंगाचा स्पॅकडी टॉप आणि गोल्डन पैजामा परिधान केलेल्या दीपिकाचे सौंदर्य पार्टीत उठून दिसत होते. कारण हा ड्रेस तिच्यावर खूप सूट होत होता. मात्र दीपिकाने घातलेल्या या टॉपची किंमत जर तुम्ही ऐकाल तर हैराण व्हाल. या टॉपची किंमत केवळ ३०० रुपये एवढी होती. ज्याला तिने ४६ हजार रुपयांच्या पैजामासोबत परिधान केले होते. 



टॉप ३०० रुपयांचा असला तरी, तिने या पार्टीत हजर राहण्यासाठी स्वत:च्या ड्रेसकोटवर तब्बल दोन लाख रुपये खर्च केले होते. बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री असलेल्या दीपिकाने केलेला हा खर्च फारसा आश्चर्य वाटणारा नसला तरी, तिच्या टॉपच्या किमतीवरून मात्र चांगलीच चर्चा रंगली होती. पण काहीही असो या ड्रेसमध्ये दीपिकाचा लूक खूपच स्टनिंग दिसत होता. पार्टीत दीपिकाने हजेरी लावताच सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. मात्र दीपिकाचा हा दोन लाख रुपये खर्च नेमका कशावर होता, याचे गणित आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

...असा ड्रेस; असा खर्च
- दीपिकाच्या एच अ‍ॅण्ड एम टॉपची किंमत केवळ ३३४.७९ रुपये
- दीपिकाचा गोल्डन पैजामाची किंमत ४६५५.१० रुपये
- ड्रेसला परफेक्ट लूक देण्यासाठी दीपिकाने ब्लॅक रंगाच्या हिल्स परिधान केल्या होत्या, त्याची किंमत ३७८८४.५९ रुपये 
- याव्यतिरिक्त दीपिकाने मिनी बॉडी बॅगही कॅरी केली होती, त्याची किंमत ११२३३९.०९ रुपये



दीपिकाच्या या संपूर्ण शृंगाराची किंमत सुमारे एक लाख ९७ हजार १०९ रुपये इतकी होती. हा काही पहिलाच प्रसंग नाही की, दीपिका तिच्या ड्रेसमुळे लाइमलाइटमध्ये आली. यापूर्वीदेखील ती तिच्या ड्रेसमुळे चर्चेत आलेली आहे. हॉलिवूड अभिनेता विन डिझेल जेव्हा त्याच्या ‘ट्रिपल एक्स’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी भारतात आला होता, तेव्हा दीपिकाने परिधान केलेल्या गोल्डन रंगाच्या गाउनमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती.  

Web Title: Shahid Kapoor's pre-birthdays party topped 300 rupees in the top Deepika Padukone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.