शाहिद कपूरच्या 'बत्ती गुल मीटर चालू'साठी यामी गौमत लागली कामाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 10:52 IST2018-02-08T05:04:48+5:302018-02-08T10:52:06+5:30

बॉलिवूडची यामी गौतम सध्या खूपच खूश आहे. ह्रतिक रोशनसोबत काबिल चित्रपटात काम केल्यानंतर यामी शाहिद कपूरसोबत आगामी चित्रपट 'बत्ती ...

For Shahid Kapoor's 'Batti Gul Miter Turning', Yamani started to work | शाहिद कपूरच्या 'बत्ती गुल मीटर चालू'साठी यामी गौमत लागली कामाला

शाहिद कपूरच्या 'बत्ती गुल मीटर चालू'साठी यामी गौमत लागली कामाला

लिवूडची यामी गौतम सध्या खूपच खूश आहे. ह्रतिक रोशनसोबत काबिल चित्रपटात काम केल्यानंतर यामी शाहिद कपूरसोबत आगामी चित्रपट 'बत्ती गुल मीटर चालू'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी यामी सध्या जोरदार तयारी करते आहे. यामी बत्ती गुल मीटर चालूमध्ये वकिलाची भूमिका साकारणार आहे. यासाठी तो हिंदी साहित्यचा अभ्यास करते आहे. यामीने सांगितले, ''पडद्यावर माझी भूमिका खूप मोठी नाही आहे मात्र यासाठी जी तयारी मी करते आहे ती जास्त इंटरेस्टिंग आहे. सध्या मी भाषेवर काम करते आहे आणि त्यासाठी मी हिंदी साहित्याची मदत घेते आहे.'' 

पुढे ती म्हणाली, ''मी श्री आणि चित्रपटातील इतर कलाकार मिळून तयारी करण्याचा प्लॉन करतो आहोत. सगळ्यांनी जर एकत्र मिळून काम केले तर त्याचा रिझल्ट नक्कीच चांगला येईल.''  आपल्या भूमिकेच्या तयारीचा एक भाग म्हणून यामी सध्या अनेक वकिलांनासुद्धा भेटते आहे.

या चित्रपटाची शूटिंग उत्तराखंडमध्ये सुरू होणार आहे. यात यामीसोबत श्रद्धा कपूरची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यामी या चित्रपटाचा भाग बनले की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्याच कारण होते की यामीने टी-सिरिजच्या सनम रे चित्रपटात काम केले होते. त्यादरम्यान टी-सिरिजच्या मालकासोबत तिचे खटके उडाले होते. टी-सिरिजचे मालक भूषण कुमार आणि पत्नी दिव्या खोसला यामीवर नाराज झाले होते. या चित्रपटाची निर्मिती प्रेरणा अरोरा आणि टी-सिरीज मिळून करते आहे आणि टी-सिरीजने प्रेरणासमोर अट ठेवली होती की जर यामीने टी-सिरिजची माफी मागतली तरच तिला या चित्रपटात साईन केले जाईल. त्यामुळे आता नक्की हे प्रकरण कसे मिटले हे कळू शकलेले नाही. आपण आशा करूया हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नक्कीच आपली कमला दाखवले. यामी या चित्रपटासाठी जी मेहनत घेते आहे ती किती कामी येते हे चित्रपट रिलीज झाल्यावरच आपल्याला कळेलच. 

ALSO REDA :  ​हृतिक रोशनच्या ‘या’ अभिनेत्रीने केले बिकिनी फोटोशूट, सोशल मीडियावर खळबळ!

Web Title: For Shahid Kapoor's 'Batti Gul Miter Turning', Yamani started to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.