शाहिद कपूर म्हणतो, कंगना राणौत सोबत माझे मतभेद नाहीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 18:44 IST2017-01-13T18:44:17+5:302017-01-13T18:44:17+5:30
कंगना राणौत, शाहिद कपूर व सैफ अली खान यांच्या आगामी ‘रंगून’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. या ...
.jpg)
शाहिद कपूर म्हणतो, कंगना राणौत सोबत माझे मतभेद नाहीत!
क गना राणौत, शाहिद कपूर व सैफ अली खान यांच्या आगामी ‘रंगून’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरूवात झाली असून, या दरम्यान अभिनेता शाहिद कपूर व अभिनेत्री कंगना राणौत यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता शाहिद कपूर याने यावर आपला खुलासा केला आहे.
शाहिद कपूरने मीडियात रंगलेल्या चर्चेचे खंडन करताना सांगितले की, रंगून बाबत सध्या ज्या चर्चा सुरू आहेत त्या संपूर्णपणे खोट्या असून, अभिनेत्री कंगना राणौत हिच्यासोबत माझे कोणतेच मतभेद नाहीत. आम्ही दोघे एकत्रित ‘रंगून’चा प्रचार करणात आहोत, तिच्यासोबत मला प्रमोशन करताना आनंदच होईल. दीपिका पादुकोण व विन डिजेल यांच्या आगामी ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज या चित्रपटाच्या प्रीमिअरला उपस्थित असलेला शाहिद मीडियाशी बोलत होता.
![]()
काही दिवसांपासून मीडियात ‘रंगून’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारी कंगना राणौत व शाहिद कपूर यांच्यात वाद निर्माण झाला असून, दोघांनी एकत्र या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. या चित्रपटात कंगना राणौत ही एकमेव अभिनेत्री असून, तिच्या अपोझिट दोन नायक आहेत. यामुळे कंगनाचा रोल या चित्रपटात महत्त्वाचा मानला जात आहे.
![]()
दिग्दर्शक विशाल भारद्वाज याच्यासोबत शाहिदचा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्याने भारद्वाज यांच्या ‘कमिने’ व ‘हैदर’ या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. ‘हैदर’साठी शाहिदला ‘फिल्मफेअर बेस्ट अॅक्टर’चा पुरस्कार मिळाला आहे. कंगना राणौतने विशाल भारद्वाज यांच्या रंगून या चित्रपटासाठी आपली फी कमी केली होती. रंगून साईन करताना कंगना अन्य निर्मात्यांकडून ११ कोटी रुपये फी घेत होती. मात्र रंगूनसाठी कंगनाने केवळ ६ कोटी रुपये शुल्क आकारले आहे.
शाहिद कपूर सध्या संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावतीची शूटिंग करीत आहे. या चित्रपटात तो दीपिका पादुकोणच्या नवºयाची भूमिका साकारत आहे.
![shahid kapoor says no clash between me and kangana ranaut]()