‘पद्मावती’ साठी शाहिद कपूरने वाढवले वजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 17:49 IST2017-01-13T17:45:41+5:302017-01-13T17:49:33+5:30

चित्रपटासाठी वजन वाढवणे, घटविणे हा आता एक सुपरहिट फॉर्म्युला बनला आहे. ‘दंगल’ चित्रपटासाठी आमिर खानने त्याचे वजन वाढवले होते. ...

Shahid Kapoor raised the weight for 'Padmavati' | ‘पद्मावती’ साठी शाहिद कपूरने वाढवले वजन

‘पद्मावती’ साठी शाहिद कपूरने वाढवले वजन

त्रपटासाठी वजन वाढवणे, घटविणे हा आता एक सुपरहिट फॉर्म्युला बनला आहे. ‘दंगल’ चित्रपटासाठी आमिर खानने त्याचे वजन वाढवले होते. चित्रपटाला मिळालेल्या यशासोबतच आमिरच्या वजन वाढवणे-घटविण्याविषयीच ‘बी टाऊन’ मध्ये जास्त चर्चा रंगली. आता आमिरप्रमाणेच आणखी एका अभिनेत्याने त्याचे आगामी चित्रपटासाठी वजन वाढवल्याचे कळतेय. ठाऊक आहे का? कोण आहे हा अभिनेता? होय, शाहिद कपूर. याने ‘पद्मावती’ चित्रपटासाठी त्याचे वजन वाढविल्याचे कळते आहे. चित्रपटातील त्याच्या महाराजा रावळ रतनसिंग या भूमिकेसाठी शाहिद गेल्या सहा महिन्यांपासून प्रशिक्षक समीर जऊरा याच्याकडे वजन वाढविण्यासाठी प्रशिक्षण घेतो आहे. 

‘पद्मावती’ हा चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. चित्रपटासाठी त्यांनी भलामोठा सेट तयार करून घेतल्याचे चित्रपटाची शूटिंग सुरू होताच कळाले होते. चित्रपटातील मुख्य कलाकार रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, शाहिद कपूर हे तिघेही चित्रपटासाठी त्यांचे बेस्ट देण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत. रणवीर सिंगने अल्लाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली आहे. तर आता शाहिदनेही महाराजांच्या भूमिकेसाठी त्यांचे वजन वाढविले आहे. यासाठी त्याला जुलै महिन्यात बूट कॅम्प करावा लागला. सहा दिवस त्याला जवळपास दोन ते अडीच तासांपर्यंत व्यायाम करावे लागले. या व्यायामांचे उद्देश एवढेच होते की, शरीरातील फॅट कमी करणे आणि हाताचे दंड वाढवणे. त्यानुसार त्याला डाएटही घ्यावे लागले. नोव्हेंबरमध्ये शूटिंग सुरू होण्याअगोदर त्यालाा जवळपास ६ महिने डाएट फॉलो करावे लागले.

शाहिद कपूर हा असा अभिनेता आहे ज्याला त्याच त्या भूमिका करण्यापेक्षा काहीतरी वेगळ्या भूमिका करण्यात रूची आहे. ‘हैदर‘,‘कमिने’ यासारख्या चित्रपटांबरोबरच त्याने रोमँटिक भूमिकाही साकारल्या. आव्हानात्मक भूमिका केल्याशिवाय कलाकाराच्या आयुष्याला काही अर्थ नाही, असे तो मानतो. मुलगी मीशा हिच्या जन्मानंतर ‘पद्मावती’ हा चित्रपट त्याचा पहिला चित्रपट आहे. कधीकधी तिलाही तो सेटवर घेऊन जात असे.

Web Title: Shahid Kapoor raised the weight for 'Padmavati'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.