‘पद्मावती’च्या सेटवर जखमी झाला शाहिद कपूर; रणवीर सिंगलाही झाली होती दुखापत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 20:46 IST2017-09-30T15:16:11+5:302017-09-30T20:46:11+5:30

सध्या संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत असून, या चित्रपटाच्या सेटवरून एक बातमी समोर येत आहे. ...

Shahid Kapoor injured on Padmavati's set; Ranveer Singh was hurt! | ‘पद्मावती’च्या सेटवर जखमी झाला शाहिद कपूर; रणवीर सिंगलाही झाली होती दुखापत!

‘पद्मावती’च्या सेटवर जखमी झाला शाहिद कपूर; रणवीर सिंगलाही झाली होती दुखापत!

्या संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत असून, या चित्रपटाच्या सेटवरून एक बातमी समोर येत आहे. होय, शूटिंगच्या सेटवर अभिनेता शाहिद कपूर जखमी झाला असून, त्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्याने शूटिंगही थांबविल्याचे सूत्रांनी सांगितले. शाहिदसोबत ही घटना ‘पद्मावती’च्या सेटवर घडली. होय, शाहिद एक स्टंट सीन शूट करीत होता, त्याचदरम्यान त्याचा हा अपघात झाला. सूत्रानुसार, शाहिदच्या वाट्याची अजून दहा दिवसांची शूटिंग शिल्लक आहे. त्याला ही शूटिंग लवकर उरकून घ्यायची होती. मात्र आता त्याला पुन्हा एकदा शूटिंग लांबवावी लागणार आहे. 

दरम्यान, शाहिद जेव्हा स्टंट सीन शूट करीत होता, तेव्हा त्याच्या तळपायाला गंभीर दुखापत झाली. ही दुखापत वाढतच असल्याने त्याला शूटिंग थांबवावी लागली. युनिटच्या एका व्यक्तीने सांगितले की, आम्हाला ‘पद्मावती’ची शूटिंग लवकरात लवकर पूर्ण करायची आहे. अशात आम्ही शूटिंग रद्द करू इच्छित नाही. काही दिवसांपूर्वीच ‘पद्मावती’च्याच सेटवर रणवीर सिंग गंभीर जखमी झाला होता. रणवीर त्यावेळी ‘पद्मावती’चा क्लायमॅक्स शूट करीत होता. रणवीरच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे रणवीर शूटिंगमध्ये ऐवढा व्यस्त होता की, त्याला आपल्या कपाळाला दुखापत झाल्याचे भानही राहिले नव्हते. जेव्हा ही बाब त्याच्या लक्षात आली तेव्हा त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर रणवीर लगेचच सेटवर परतला होता. त्याने त्याच दिवशी शूटिंग पूर्ण केले. 

दरम्यान, आता शाहिदने लवकराच लवकर बरे होऊन सेटवर पोहोचावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चित्रपटात त्याने राणी पद्मावतीचे पती महारावल रतन सिंग यांची भूमिका साकारली आहे, तर राणी पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण आहे. रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे. हा चित्रपट रिलीज अगोदरच वादाच्या भोवºयात सापडला आहे. 

Web Title: Shahid Kapoor injured on Padmavati's set; Ranveer Singh was hurt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.