शाहिद कपूरला इंडस्ट्रीतील दोन लोकप्रिय अभिनेत्रींनी प्रेमात दिला होता धोका, अखेर खुलासा करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 12:53 PM2024-05-06T12:53:15+5:302024-05-06T12:55:17+5:30

बॉलिवूडचा चॉकेलट बॉय म्हणून ओळखला जाणारा शाहिद कपूर नेहमीच चर्चेत असतो.

Shahid kapoor cheated by two popular actresses in the industry | शाहिद कपूरला इंडस्ट्रीतील दोन लोकप्रिय अभिनेत्रींनी प्रेमात दिला होता धोका, अखेर खुलासा करत म्हणाला...

शाहिद कपूरला इंडस्ट्रीतील दोन लोकप्रिय अभिनेत्रींनी प्रेमात दिला होता धोका, अखेर खुलासा करत म्हणाला...

बॉलिवूडचा चॉकेलट बॉय म्हणून ओळखला जाणारा शाहिद कपूर नेहमीच चर्चेत असतो. आतापर्यंत शाहिदने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर शाहिदने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. २००३ मध्ये शाहिदने 'इश्क विश्क' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अभिनयासोबतच शाहिदची लव्ह लाईफही चांगलीच चर्चत राहिली. एका मुलाखतीमध्ये शाहिदने प्रेमात फसवणूक झाल्याचा धक्कादायक खुलासा केला. 

मीरा राजपूतशी लग्न होण्यापूर्वी शाहिद हा बॉलिवूड अभिनेत्रींच्या अनेकदा प्रेमात पडला. परंतु, काही कारणास्तव त्याची लव्हस्टोरी अपूर्णच राहिली. शाहिदनं नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर नेहा' शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी शाहिदने खुलासा केला की त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्सनी त्याची फसवणूक केली होती. 

 प्रेमात तुझी कोणी फसवणूक केलेली का?  असा प्रश्न नेहानं त्याला विचारला. यावर तो जोरजोरात हसायला लागला आणि म्हणाला, 'मला एकीबद्दल खात्री आहे. पण, मला दुसरीबद्दल थोडी शंका आहे. तर दोन मुलींनी माझी प्रेमात फसवणूक केलेली आहे. पण मी त्यांच नाव घेणार नाही'. जेव्हा शाहिदने त्यांची नावे   घेण्यास नकार दिला, तेव्हा नेहा धुपियाने विचारलं, 'या त्या दोन प्रसिद्ध महिला आहेत का, ज्यांना तु डेट केलं होतं?' यावर शाहिद म्हणाला, 'मी याचं उत्तर देणार नाही'. 

शाहिदच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी तर्कवितर्क लावून त्या दोन महिला करीना कपूर खान आणि प्रियांका चोप्रा असल्याचं म्हटलं आहे. शाहिद-करिना आणि शाहिद-प्रियंकाच्या रिलेशनशिपच्या बातम्या एकेकाळी प्रचंड गाजल्या होत्या. दरम्यान शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतेच त्याचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' सिनेमा प्रदर्शित झाला होता. तर याआधी तो वेब सीरिज फर्जीमध्ये दिसला होता. यानंतर तो लवकरच देवा' सिनेमाच्या माध्यमाातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Shahid kapoor cheated by two popular actresses in the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.