शाहिद कपूरने विकत घेतली महागडी बीएमडब्ल्यूची बाइक, किंमत ऐकून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 19:58 IST2019-03-09T19:58:12+5:302019-03-09T19:58:31+5:30
शाहिदने नुकतीच BMW R 1250 GS Adventure बाइक खरेदी केली आहे. या बाइकचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

शाहिद कपूरने विकत घेतली महागडी बीएमडब्ल्यूची बाइक, किंमत ऐकून व्हाल हैराण
बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्यांना महागड्या बाइक्सचा कलेक्शनचा छंद आहे. या यादीत अभिनेता शाहिद कपूरच्या नावाचा देखील समावेश आहे. शाहिदने नुकतीच BMW R 1250 GS Adventure बाइक खरेदी केली आहे. या बाइकचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
शाहिदने नव्या बाइकचा फोटो शेअर मीडियावर शेअर करीत लिहिले की, हसण्याचे कारण १२५० आहे. शाहिदच्या या नव्या बाइकची किंमत १८ लाख २५ हजार रुपये इतकी आहे.
शाहिदला बाइक कलेक्शनचा छंद आहे. त्याच्याजवळ डुकाटी स्क्रैंबलर 1200, हार्ले डेविडसन फैटबॉय आणि यामाहा MT01 या बाइक्स आहेत. या बाइकची किंमत १०.५ लाख आहे.
शाहिदने नुकतेच त्याचा मुलगा झेनसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यात झेन खूप क्यूट दिसतो आहे.
शाहिदच्या प्रोफेशनल लाइफबद्दल बोलायचे तर तो दाक्षिणात्य चित्रपट अर्जुन रेड्डीच्या रिमेक कबीर बेदीमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.